पुणे, दि.२७: विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह दोन्ही कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी माहिती अधिकार दिन आज साजरा करण्याबाबत सर्व विभागाना आदेश दिले होते. कार्यक्रमात यशदाचे अतुल गाडे यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ विषयी मार्गदर्शन केले.
0000


