*ठाणे, दि.27(जिमाका):* देशातील आदिवासी जमातींच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरिता “प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान” ही योजना राबविण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
देशातील आदिवासी जमातीच्या बांधवांसमवेत दि.०२ ऑक्टोबर,२०२४ रोजी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधून या योजनेच्या अंमलबजावणी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण संपूर्ण देशभर करण्यात येणार आहे. दूरदृष्यप्रणालीद्वारे होणाऱ्या पंतप्रधान महोदयांच्या या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासाठी ठाणे जिल्हयातील शांग्रिला रिसोर्ट, वडपे, ता. भिवंडी येथील शांग्रिला हॉल हे स्थळ निश्चित करण्यात आलेले आहे, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर, प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार बी. हिवाळे यांनी कळविले आहे.
0000000000


