Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिरामय आरोग्यासाठी जेष्ठांनी लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये

निरामय आरोग्यासाठी जेष्ठांनी लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये

पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघ आणि लोकमान्य हॉस्पिटल्स तर्फे ज्येष्ठांशी आरोग्यसंवाद कार्यक्रम संपन्न

 

 

 

पुणे, 26 सप्टेंबर 2024 : योग्य आहार व व्यायाम, चांगली जीवनशैली, सुरु असलेल्या औषधांमध्ये सातत्य राखणे,वृध्दापकाळामधील उद्भवणाऱ्या आजारांबाबत जागरूक राहणे आणि लवकर निदान व उपचार याबाबत मार्गदर्शनासह आरोग्यसंवादच्या माध्यमातून उत्तम शारीरिक,मानसिक आरोग्य राखण्याचा संदेश देण्यात आला. पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघ आणि लोकमान्य हॉस्पिटल्स तर्फे ज्येष्ठांशी आरोग्यसंवाद एक पाऊल आरोग्याकडे हा कार्यक्रम नुकताच पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृह येथे पार पडला. ज्येष्ठांच्या आरोग्याशी निगडीत आणि इतर समस्या जाणून घेणे व त्याबाबत तज्ञांच्या मार्फत मार्गदर्शन करून जीवनमान अधिक सुलभ करणे हा या वार्षिक कार्यक्रमाचा हेतू आहे. लोकमान्य हॉस्पिटलचे मुख्य कामकाज अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक मनप्रीत सिंग सोहल यांच्या हस्ते जेष्ठ नागरिकांसाठी सवलतीच्या कार्डचे अनावरण करण्यात आले.

 

लोकमान्य हॉस्पिटलचे संस्थापक व अध्यक्ष डॉ.नरेंद्र वैद्य यांनी दृक्श्राव्य माध्यमातून उपस्थितांना गुडघ्याच्या तसेच सांध्याच्या समस्या आणि रोबोटिक सर्जरीबाबत मार्गदर्शन केले.

 

या कार्यक्रमासाठीआंतरराष्ट्रीय कीर्तीचे सांधेरोपण तज्ञ आणि लोकमान्य हॉस्पिटलचे संस्थापक व अध्यक्ष डॉ.नरेंद्र वैद्य, मुख्य कामकाज अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक मनप्रीत सिंग सोहल तसेच पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्ष वृषाली मरळ व सहसचिव शांताराम सातव हे उपस्थित होते. याप्रसंगी ट्रॉमा आणि सांधे प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ.आशिष सुर्यवंशी, शल्यचिकित्सक डॉ.प्रशांत केदारी, इंटर्नल मेडिसिनच्या डॉ.प्रीती रूपनार, न्युरोसर्जन डॉ.निलेश खानझोडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात ५००हुन अधिक ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. आरोग्य संवाद बरोबर ज्येष्ठांचा सहभाग असलेल्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी कविता सादर केली, त्याचबरोबर फॅन्सी ड्रेस स्पर्धा व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.श्रीकृष्ण जोशी यांनी केले तसेच समन्वयक म्हणून अनंत वैद्य यांनी काम पाहिले.

 

 

 

 

यावेळी संधिवात,ऑस्टियोपोरोसिस,प्रोस्टेट व वृद्धपकाळात उद्भवणाऱ्या इतर समस्या, लवकर निदान व उपचाराचे महत्व,गुडघ्याची शस्त्रक्रिया व रोपण, रोबोटिक शस्त्रक्रिया,चांगले जीवनमान राखण्यासाठी व्यायाम व संतुलित आहार याबाबत विविध तज्ज्ञांनी मार्गदर्श

न केले .

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments