Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedपॉकेट मनी'तील छोट्या गुंतवणुकीतूनच पैशाची किंमत कळते व स्वयंपूर्णता येते प्रसिद्ध...

पॉकेट मनी’तील छोट्या गुंतवणुकीतूनच पैशाची किंमत कळते व स्वयंपूर्णता येते प्रसिद्ध आर्थिक गुंतवणूक तज्ज्ञ आणि सीए रचना रानडे यांचा तरुणांना संदेश

कोथरूड व्यासपीठतर्फे ‘पॉकेट मनी’ पासून समृद्धी, लाखमोलाची गोष्ट’ या कार्यक्रमाचे आयोजन

पुणे, दि. २८ सप्टेंबर २०२४ : तरुण वयातील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांकडून मिळणाऱ्या ‘पॉकेट मनी’चा वापर आवश्यक तो खर्च करण्याबरोबरच छोट्या गुंतवणुकीतून अभ्यास करून तसेच त्यातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन करता येईल. यातून लहान वयातच खर्च करण्याबरोबर पैशाची किंमत समजल्यामुळे स्वयंपूर्ण होण्याची वृत्ती वाढीस लागेल, असा संदेश प्रसिद्ध स्टॉक मार्केट अभ्यासक आणि सीए रचना रानडे यांनी दिला.

तरुणांमध्ये आर्थिक साक्षरतेबाबत जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने कोथरूड व्यासपीठतर्फे ‘पॉकेट मनी’ पासून समृद्धी, लाखमोलाची गोष्ट’ या कार्यक्रमाचे आयोजन कोथरूड व्यासपीठाचे अध्यक्ष शाम देशपांडे यांनी केले. अध्यक्षस्थानी सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर होते. यावेळी बँकिंग तज्ज्ञ आणि दि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर उपस्थित होते. रत्ना दहिवलकर यांनी सूत्रसंचालन केले.

रचना रानडे पुढे म्हणाल्या की, मराठी माणूस हा गुंतवणुक, शेअर बाजार, म्युच्युअल फंड याबाबतीत पैसे गुंतवताना दिसत नाही. तरुण वयापासूनच आपल्याकडे असणाऱ्या पैशाबाबत साक्षरता येण्यासाठी व तो वाढवण्याची सवय लागायला हवी. यासाठी स्टॉक मार्केटमध्ये पहिले पाऊल लवकरात लवकर टाकून किमान एक शेअर तरी खरेदी करायला हवा.अधिक जागरुकता वाढवण्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावे.

त्या म्हणाल्या की, सर्व वयातील लोकानी पैशाची गुंतवणूक विचारपूर्वक करायला हवी. घरातल्या सर्व सदस्यांनी याबाबत जागरुक राहून गुंतवणुकीसाठी आर्थिक नियोजन करायला हवे. यातून आर्थिक साक्षरतेबरोबरच पैसा गुंतवण्याची एक नवी दृष्टी निर्माण होईल.

डॉ. काळकर म्हणाले की, आर्थिक साक्षरता येण्यासाठी आपल्या अभ्यासक्रमातून पैसे कमावताना ते वापरायचे व गुंतवायचे कसे या शिक्षणाचाही अंतर्भाव व्हायला हवा. पैशाचा विनियोग व किंमत याच वयात कळायला ही ज्या वयात तरुण मुले पिझ्झा व कोल्ड कॉफीसाठी भरपूर पैसा खर्च करतात. थेंबाथेबानेच पैसाही जमा होतो हे जितके लवकर समजेल त्या वयात पॉकेट मनीतून गुंतवणुकीचे धडेही शिकता येतील.

लहान वयात स्वतः कमावले तर पैशाची किंमत लवकर समजते व आर्थिक शिस्त अंगी बाणवता येते, असे सांगून अनास्कर म्हणाले की, या वृत्तीतूनच तरुण वयात उद्यमशीलता वाढवता येते. शिक्षणाबरोबरच पैसे कमावण्याचे व बचतीचे सवय लावून घेता येते.

कार्यक्रमाचे आयोजक शाम देशपांडे यांनी आपल्या प्रास्तविकात सांगितले की प्रत्येकाच्या कॉलेज जीवनात पॉकेट मनी कमी अधिक मिळत असतो. त्या पैशाला सत मार्ग मिळावा आर्थिक साक्षरता वाढावी. यातून तरुण वयातच आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन आम्ही केले .

गुगल फॉर्मच्या माध्यमातून झालेल्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून कोथरूडमधील तरूणांचा आर्थिक साक्षरता निर्देशांकचा रिपोर्ट प्रत्यक्षात या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्या

त आला .

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments