Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedयूएसव्‍हीकडून किफायतशीर दरामध्‍ये हार्ट फेल्‍युअर मेडिकेशन 'ऑनअर्नी' लॉंच

यूएसव्‍हीकडून किफायतशीर दरामध्‍ये हार्ट फेल्‍युअर मेडिकेशन ‘ऑनअर्नी’ लॉंच

मुंबई, १५.१०.२४ – यूएसव्‍ही प्रा. लि. ने हार्ट फेल्‍युअरच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी सॅक्‍युबिट्रिल व वल्‍सार्टनचे निश्चित डोस संयोजन ‘ऑनअर्नी’ (OnArni) लॉंच केले आहे. ५० मिलीग्रॅमसाठी प्रतिटॅब्‍लेट किंमत ८ रूपये आहे. हा किफायतशीर पर्याय भारतातील हार्ट फेल्‍युअरच्‍या वाढत्‍या प्रमाणाचे निराकरण करतो, तसेच सर्वाधिक गरज असलेल्‍या लाखो रूग्‍णांना जीवनदायी केअर देतो.
भारतात हार्ट फेल्‍युअर केसेसचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, जेथे जगातील इतर देशांच्‍या तुलनेत रूग्‍णांना हा आजार १० वर्ष लवकर होत आहे. हा आजार लवकर होत असल्‍यामुळे कुटुंब व आरोग्‍यसेवा सिस्‍टमवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. हार्ट फेल्‍युअरचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी आजीवन औषधोपचार करावे लागतात, तसेच वारंवार हॉस्पिटलमध्‍ये जावे लागल्‍याने मोठ्या प्रमाणात वैद्यकीय खर्च होतो. अनेकजण उपचारासाठी होणाऱ्या मोठ्या खर्चामुळे प्रीस्क्रिप्‍शनचे योग्‍यरित्‍या पालन करत नाही, ज्‍यामुळे त्‍यांची प्रकृती अधिक खालावते. यूएसव्‍ही प्रा. लि. ने लॉंच केलेले बायोइक्विव्‍हॅलण्‍ट ऑनअर्नी किफायतशीर, वेळेवर सोल्‍यूशन देते, जे आजीवन हार्ट फेल्‍युअरवरील उपचारासाठी होणारा आर्थिक भार कमी करते.
यूएसव्‍हीचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. प्रशांत तिवारी किफायतशीर हार्ट फेल्‍युअर सोल्‍यूशन्‍ससाठी गरज व्‍यक्‍त करत म्‍हणाले, ”कार्डियोव्‍हॅस्‍कुलर केअरमधील अग्रणी म्‍हणून यूएसव्‍हीमध्‍ये आमच्‍यासाठी बायोइक्विव्‍हॅलण्‍ट ऑनअर्नी लॉंच करणे महत्त्वाचे पाऊल होते, ज्‍यामधून हार्ट फेल्‍युअर उपचार किफायतशीर व उपलब्‍धहोण्‍याजोगे असण्‍याची खात्री मिळते. सुरूवातीच्‍या डोसची प्रतिटॅब्‍लेट किंमत ८ रूपये असण्‍यासह ऑनअर्नी रूग्‍णांना त्‍यांच्‍या औषधोपचाराचे पालन करण्‍यास मदत करते, जे स्थितीचे कार्यक्षमपणे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी महत्त्वाचे आहे. रूग्‍णांना औषधाचे डोस टाळण्‍यास कारणीभूत ठरणारा आर्थिक भार कमी करत आमचा सतत हॉस्पिटलमध्‍ये भरती होण्‍याचे प्रमाण कमी करण्‍याचा आणि दीर्घकाळापर्यंत आरोग्‍य उत्तम राखण्‍यास मदत करण्‍याचा मनसुबा आहे.”
ऑनअर्नी पॅकेजिंगसह येते, ज्‍यामधून त्‍याची जीवनदायी क्षमता दिसून येते. अलू-अलू ब्लिस्‍टर पॅक्‍समध्‍ये स्‍माइलिंग हार्ट्स व म्‍युझिक टोन्‍सचा समावेश आहे, जे उपचारानंतर आनंदी व आरोग्‍यदायी हृदयाचे प्रतीक आहेत.
आता देशभरात उपलब्‍ध असलेल्‍या ऑनअर्नीमधून हार्ट फेल्‍युअर निष्‍पत्ती वाढवण्‍याप्रती यूएसव्‍हीची कटिबद्धता दिसून येते, ज्‍यासाठी ते खात्री घेत आहेत की औषधोपचाराचा खर्च प्रभावी उपचारामध्‍ये अडथळा आणणार नाही. किफायतशीर व उपलब्‍धहोण्‍याजोगे पर्याय देत यूएसव्‍ही भारतातील कुटुंबांवरील आरोग्‍यसेवा भार कमी करण्‍यासाठी आपल्‍या मिशनला सरकारच्‍या उपक्रमांशी संलग्‍न करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments