Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedराहुल देशपांडे लाईव्ह इन कॉन्सर्ट आज (दि.१६) देशप्रेमी मित्र मंडळ यांच्यातर्फे आयोजन...

राहुल देशपांडे लाईव्ह इन कॉन्सर्ट आज (दि.१६) देशप्रेमी मित्र मंडळ यांच्यातर्फे आयोजन ; विनामूल्य प्रवेश

पुणे : देशप्रेमी मित्र मंडळ यांच्यावतीने गुरुवार, दिनांक १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एरंडवणे येथील गांधी लॉन्स येथे कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती मंदार चंद्रशेखर बलकवडे यांनी दिली.

कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सोलवूड वेंचर यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य असून कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेश आहे.

एरंडवण्यातील गणेश नगर येथील देशप्रेमी मित्र मंडळ विविध कार्यक्रमातून आपली सामाजिक बांधिलकी जपत असते. दुष्काळग्रस्त भागात धान्य मदत, कोरोना काळात गरजूंना अन्नधान्य, भाजीपाला, आरोग्य साहित्य मोफत देणे यासोबतच पुस्तकहंडी सारखा आगळावेगळा कार्यक्रम सुरू करून वेगळ्या माध्यमातून दहीहंडी साजरा करण्याचा पायंडा मंडळाने घातला. याशिवाय महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा जपली गेली पाहिजे यासाठी विविध कार्यक्रम मंडळाच्या वतीने राबविण्यात येतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments