Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedचारचाकींसाठी लवकरच नवीन मालिका*

चारचाकींसाठी लवकरच नवीन मालिका*

पुणे, दि. १६: चारचाकी खासगी वाहनांसाठी लवकरच सुरु होणाऱ्या नवीन मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरुन राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचा क्रमांक हवा असेल त्यांनी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० दरम्यान कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करणे आवश्यक राहील. एकाच क्रमांकाकरिता जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी कार्यालयीन सूचनाफलकावर लावण्यात येईल.

या यादीतील अर्जदारांनी लिलावासाठी जास्त रक्कमेचा एकच डीडी २२ ऑक्टोबर रोजी रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात घालून कार्यालयात जमा करावा. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहकार सभागृह परिवहन कार्यालय येथे उप प्रादेशिक अधिकारी व सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तिसमोर लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने जास्तीत जास्त रकमेचा धनाकर्ष सादर केला असेल त्यास पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून ६ महिन्याच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व भरलेले शुल्क शासनाच्या तिजोरीत जमा होईल. अधिक माहितीसाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये यांनी केले आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments