Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorized*दुचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक चारचाकींसाठी राखून ठेवता येणार*

*दुचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक चारचाकींसाठी राखून ठेवता येणार*

पुणे, दि. १६: पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच सुरू होणाऱ्या दुचाकी वाहनांसाठीच्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत दुचाकींसाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक चारचाकींसाठी हवे असलेल्या वाहन मालकांनी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत खासगी वाहन नोंदणी विभागात विहीत शुल्कासह विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे धनाकर्ष (डीडी) २४ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत स्वीकारले जातील. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव करण्यात येईल.

आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक हवे असलेल्या दुचाकी वाहन मालकांनी २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत अर्ज करावा. एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे डीडी २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत स्वीकारले जातील. प्राप्त अर्जाचा लिलाव त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहकार सभागृहामध्ये करण्यात येईल.

नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत वाहनाच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास पसंती क्रमांकाची वैधता संपुष्टात येते. परंतु, आता एनआयसी संकेतस्थळामार्फत या प्रक्रियेमध्ये बदल झाला असून वैधता संपलेले पसंती क्रमांक हे नागरिकांना पसंती क्रमांकाच्या संकेतस्थळावर उपलव्ध असल्याचे दिसतात. सहायक रोखपाल यांच्याकडे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राध्यान्य’ या तत्वानुसार अर्ज करणाऱ्या इतर कोणत्याही व्यक्तीला पसंती क्रमांक जारी करण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments