Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedमतदान जागृतीसाठी उदय निरगुडकरांचे व्याख्यान*

मतदान जागृतीसाठी उदय निरगुडकरांचे व्याख्यान*

*
पुणे -विद्यार्थ्यांमध्ये मतदान जागृतीसाठी फर्ग्युसन महाविद्यालयात ज्येष्ठ संपादक डॉ. उदय निरगुडकर यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता.२६) सकाळी ११ वाजता अॅम्फी थिएटरमध्ये हा कार्यक्रम होईल. दोन दिवस शहरातील विविध संस्थांच्या वतीने डॉ. उदय निरगुडकर यांच्या प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवारी २६ रोजी संध्याकाळी सहा वाजता कात्रजच्या राजस सोसायटीजवळील रामभाऊ म्हाळगी शाळेत सुखसागर सांस्कृतीक मंडळाच्या वतीने, तसेच कसबा पेठेतील आरसीएम गुजराथी स्कुल येथे संपदा बॅंकेच्या वतीने संध्याकाळी सव्वा सात वाजता १०० टक्के मतदानासाठी डॉ. निरगुडकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. रविवारी (ता. २७) कर्वेनगरच्या शैलेश सभागृहात केशव माधव न्यासाच्या वतीने सकाळी नऊ वाजता विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ११ वाजता बिबवेवाडीपरिसरातील जेधेनगरच्या पार्वती बंगला येथेही डॉ. निरगुडकर मतदान जागृतीसाठी नागरिकांशी संवाद साधतील.तरूण मतदार, नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन प्रबोधन मंचाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments