पुणे, २३ ऑक्टोबर २०२४ : निकॉन कॉर्पोरेशनची संपूर्ण उपकंपनी असलेल्या निकॉन इंडिया प्रा.लि.तर्फे वेडिंग फिल्म अवॉर्ड्सच्या चौथ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वेडिंग व्हिडिओग्राफर आणि सिनेमॅटोग्राफर यांना आपली सर्जनशीलता सादर करता येणार असून या प्रतिष्ठित वार्षिक स्पर्धेमध्ये अत्याधुनिक निकॉन झेड६आयआयआय कॅमेरासह 6 लाख रुपयांहून अधिक किमतीची आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. मॅजिकल मेमरीज ही या स्पर्धेची संकल्पना असून या क्षेत्रातील अनुभवी तसेच उदयोन्मुख प्रतिभांना त्यांच्या लेन्सद्वारे सर्जनशीलता दर्शविण्यासाठी प्रोत्साहित करते. ही स्पर्धा २४ ऑक्टोबर पासून सुरु होणार असून 8 जानेवारी 2025 पर्यंत भारतातील सर्व उत्साही आणि वेडिंग व्हिडिओग्राफर यात सहभागी होऊ शकतात.
निकॉन इंडिया तर्फे वेडिंग फिल्म अवॉर्ड्स 2024
RELATED ARTICLES


