पंतप्रधानांच्या फीक्की’मधील भाषणावर काँग्रेस’ची टिका..!
ईलेक्ट्रॅाल बॅांड मधून मिळालेल्या पक्षनिधीमुळे ‘कामगार विरोधी व उद्योगपती धार्जिण’ धोरणे राबवण्यास मोदी सरकार हतबल
– पुणे दि. २२ /११ /२६
प्रजासत्ताक भारतात, ‘सांविधानिक लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेत’ उद्योग व रोजगार विषयक धोरणे राबावणाऱ्या केंद्र सरकार’ने उद्योगपतींकडे नोकऱ्यांची विचारणा वा याचना करणे ही शोकांतिका असून, भाषणजीवी सरकारच्या अपयशाची कबुली असल्याची प्रखर टीका पंतप्रधानांच्या फीक्की’मधील भाषणावर काँग्रेस’ने केली व रोजगार निर्मिती व कामगार पोषक धोरणे राबवण्यापेक्षाही भांडवलशाहिस अनुकूल ‘उद्योगपती धार्जिण धोरणे’ राबवण्यास मोदी सरकार हतबल असल्याचे चित्र स्पष्ट झाल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस’चे वरिष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
ते पुढे म्हणाले की २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून ४४ पैकी २९ कामगार हिताचे कायदे रद्द केले,
त्यामुळेच अर्थिक नफा केंद्रस्थानी ठेऊन उद्योजक व उद्योगपतींनी कामगार खर्च कमीत-कमी करण्याच्या दृष्टीने पावले उचलली व सरकार बघ्याची भूमिका घेत बसले.
मात्र देशांतर्गत युवा शक्ती जागरूक होत असल्याचा प्रत्यय, १२ वर्षे निद्रीस्त अहंभावी सरकारला नुकताच येत असलयाने व प्रतिवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याच्या घोषणेचे उशीरा स्मरण झाल्याने, सत्तारूढ कुंभकर्ण जागा झाला व ‘फिक्की’ उद्योग संघटनेच्या सभेत, भाषणजीवी प्रधानमंत्री मोदी यांनी उद्योगपतींनाच नोकऱ्या व कामगारांची पगारवाढ विषयी विचारणे केली हा लोकशाही व्यवस्थेतील मोठा विनोद असुन मोदी सरकारने रोजगार, नोकऱ्या विषयी सरकारच्या अपयशाची कबुलीच दिली असल्याची टिका कॉंग्रेसचे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
भाजप’ शीर्ष नेतृत्वाने, इलेक्ट्रॅाल बॅांड स्वरुपात देणग्या व पक्षनिधी घेऊन उद्योगपतींना टॅक्स सवलती, कर्ज माफी इ देऊन त्यांना हवे तसे मात्र कामगार हित-संरक्षक कायदे रद्द करून, उदियोगपतीं धार्जिण कायदेशीर सोई करून उद्योगपती मित्रांवर खैरात केली व आता मात्र त्याच उद्योगपती मित्रांना देशातील तरूणांना, बेरोजगारांना नोकऱ्या कुठे आहेत(?) हे विचारण्याची उपरती झाली ही बेरोजगार तरूणांची एक प्रकारे थट्टा असल्याची प्रखर टिका ही काँग्रेसचे वरीष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी ‘पंतप्रधानांच्या फीक्की संघटनेच्या सभेत केलेल्या निवेदनावर’ बोलतांना केली..!
ते पुढे म्हणाले की, भाषणजीवी मोदी यांची १९७० च्या इंदिराजी गांधी यांच्या ‘गरीबी हटाव’ धोरणावरील टिका’ परस्पर विरोधाभासी असून, पंतप्रधानांची ‘बोध्दीक दिवाळखोरी’ असल्याचे सांगितले.
१९७० मध्ये लोकसंख्या ५० कोटी असताना आजच्या एवढी संपन्नात देशात नव्हती. स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभरणीस केवळ २ दशके झाली होती, देशास अमेरिके कडून मिलो घ्यावा लागत होता. देश शत्रूराष्ट्रांच्या युद्धाच्या छायेत होता मात्र त्यानंतर ही पंडित नेहरू, शास्त्री व इंदिराजींच्या नेतृत्वाखाली धरणे – तलाव बांधून देशात कृषि क्रांति, श्वेत क्रांति, खाजगी सावकारी’च्या दुष्ट चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांची मुक्तता करून, बँकाचे राष्ट्रीय करण, सेटालाईट – उपग्रहा द्वारे देशास आत्मनिर्भर व प्रगतिपथावर आणण्याचे काम कॉँग्रेस’ने केले.
मात्र सवकर्तुत्वाचे दाखले (पूर्वीच्या पंतप्रधानांचे प्रमाणे) एक ही पत्रकार परिषद न घेता दाखवू शकत नसलेले भाषणजीवी व श्रेयजीवी पंतप्रधान मोदी (कॉँग्रेस’ला गरीबी हटवता आली नाही सांगताना) मात्र.. आज ही “८० कोटी जनतेस स्वस्त धान्य देण्याचे” तुनतूने स्वतः मोदी सरकार वाजवत असल्याचे विसारतात.
देशातील योजना आयोग (planning commission) बरखास्त करून, विकास दराची विसंगत व सदोष निष्कर्षाची आकडेवारी जाहीर करतात.
तसेच ५० कोटी जनतेस गरीबीतून वर काढलयाचा पोकळ दावा करतांना देखील,
२०१४ ऐवजी २०११ पासूनची (यूपीए-२: डॉ मनमोहनसिंग काळातील २६ कोटी जनता दारिद्र्य रेषे बाहेर आल्याचे) आकडेवारी सांगतांत व यूपीए’चे श्रेय चोरतात.
योजना आयोग बरखास्त केल्याने “No_counting – No Accountability” च्या पळवाटीच्या धोरणा नुसार (जीत्याची खोड…) म्हणी नुसार जनतेच्या डोळ्यात धूळ-फेक करतात हा स्थायी-भाव भाजप’च्या भाषणजीवी शीर्ष नेतृत्वाचे ठायी झाला असल्याची प्रखर टीका ही कॉँग्रेस वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
————————————


