पुणे , दिनांक: १५ जानेवारी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी , पुणेतर्फे एमआयटी डब्ल्यूपीयू समिट २०२४ या १७व्या राष्ट्रीय पातळीवरील क्रीडास्पर्धाचे friday दिनांक १९ जानेवारी २०२४ ते मंगळवार दिनांक 23 जानेवारी २०२४ या कालावधीत एमआयटी डब्ल्यूपीयू येथे आयोजन करण्यात आले आहे. २००४ या वर्षा पासुन या स्पर्धा घेण्यात येत आहेत. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ४:०० वाजता एमआयटी डब्ल्यूपीयू कॅम्पस, कोथरूड, पुणे येथे होणार आहे. या समारंभासाठी अर्जुन पुरस्कार प्राप्त ओल्योलिम्पियन श्री वीर्धवल खडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक आध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील. तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कर्याआधक्ष राहुल विश्वनाथ कराड हे उपस्थित राहतील. या समारंभात क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल अर्जुन अवार्डी श्रीमती शकुंतला खटावकर यांना एमआयटी डब्ल्यूपीयू क्रीडा महर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच ग्रांडमस्टर, ध्यानचंद अवार्दी श्री अभिजीत कुंटे यांना एमआयटी डब्ल्यूपीयू क्रीडा आचार्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या स्पर्धेमध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, फुटबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस, लॉन टेनिस,कबड्डी, चेस, स्विमिंग, ई स्पोर्ट्स अशा एकूण ११ कृदप्रकरणंचा समावेश करण्यात आला आहे .
या स्पर्धसाठी करंडक, पदके व रोख रक्कम असे एकूण १५लाख रुपैंचे बक्षिसे व प्रशिस्तीपत्रिके दिली जातील.सर्व साधारण विजेत्या संघाला करंडक व ५१ हजार रुपैंचे रोख बक्षीस दिले जाईल. प्रत्येक क्रीडाप्रकारातील विजेत्या संघाला करंडक, सुवर्ण पदक व रुपये ७ हजार ते २५ हजार रोख.याखेरीज उपविजेत्या संघाला करंडक, रौप्य पदक व रोख रक्कम रुपये ४ हजार ते १६ हजार देण्यात येणार आहे.
पारितोषिक वितरण समारंभ:
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार, दि. २३ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ५.०० वा. माईर्स एमआयटी, पुणेच्या संत ज्ञानेश्र्वर सभागृहात होणार आहे. गेली १६ वर्षे आपण हे स्पर्धा फक्त अभियांत्रिकी महविद्यालायासाठी आयोजित करत आलो होतो. एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्यकारी संचालक राहूल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून या वर्षी पासून या स्पर्धेत खाजगी विद्यापीठna व इतर सर्व महाविद्यालयांना ही, सहाभागी करून घेण्यात येत आहे.
या स्पर्धेत पुणे विभागातून २५ अभियांत्रिकी महाविद्यालये ३० ईतर महाविद्यालये , उर्वरित महाराष्ट्रातून ०६ , इतर राज्यातील २ महाविद्यालय, तसेच पुण्यातील ८ खाजगी विद्यापीठे, महाराष्ट्रातून 1 व, बाहेरच्या राज्यातील २ महाविद्यालये, विद्यापीठे सहभागी होणार आहेत. एकूण ११ खाजगी विद्यापीठांचे व ५५ महाविद्यालयांचे एकूण सुमारे २,५०० स्पर्धक भाग घेत आहेत . इतक्या व्यापक प्रमाणात खेळाडूंचा सहभाग असलेली देशातील ही एकमेव स्पर्धा आहे.
खेळाच्या माध्यमातून राष्ट्रउभारणी आणि विश्र्वशांती हा या स्पर्धा आयोजन मागचा प्रमुख हेतू आहे . महाविद्यालया च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमाखेरीज शारीरिक शमते कडे ही लक्ष द्यावे, अशी संयोजकांनी अपेक्षा आहे . विविध क्रीडा प्रकांमध्ये निश्नात खेळाडूंना प्रोटशान्हण मिळावे व इतर विद्यार्थ्यांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी हा या स्पर्धेचा आयोजनातील एक प्रमुख हेतू आहे अशी माहिती समीट राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजन समिती चे विद्यार्थी प्रतीनिंध तान्या वर्गीस, पार्थ साठे, अर्पिता दीप, ध्रुव चौधरी यांच्या समवेत डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ.आर. एम. चिटणीस, क्रीडा संचालक प्रा. डॉ. पी. जी.धनवे, स्पर्धेचे सलागर मंदार तमान्हे, योगेश नातू, विलास कथुरे व रोहित बागवडे यांनी पत्रकारपरिषदेत दिली.


