Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedन्युजेन इन्शुरन्स ब्रोकिंग ला सर्वोत्कृष्ट इंशुअरटेक पुरस्कार

न्युजेन इन्शुरन्स ब्रोकिंग ला सर्वोत्कृष्ट इंशुअरटेक पुरस्कार

पुणे,28 ऑक्टोबर 2024 : न्युजेन इन्शुरन्स ब्रोकिंग प्रा.लि.यांना मुंबई येथील रॅडिसन ब्ल्यू येथे पार पडलेल्या दुसऱ्या लेंडटेकएक्स ॲवॉर्डसमध्ये बेस्ट इंशुअरटेक ऑफ द ईयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

इन्शुरन्स आणि लेंडिंग टेक्नोलॉजी उद्योगातील सर्वात नाविन्यपूर्ण आणि प्रभावशाली कंपन्या तसेच व्यक्तींना लेंडटेकएक्स पुरस्कारांमध्ये सन्मानित केले जाते.सर्वांगीण विमा आणि जोखीम व्यवस्थापनाचा अनुभव प्रदान करत रिटेल तसेच कॉर्पोरेट ग्राहकांसाठी इन्श्युरन्स सोल्युशन्स अखंडपणे एकत्रित करण्याची क्षमता असलेल्या इन्श्युरन्सझी या न्युजेनच्या नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्मने परीक्षकांना आकर्षित केले.

जटील जोखीम व्यवस्थापन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि उत्कृष्ट ग्राहकसेवा प्रदान करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराप्रती हा पुरस्कार न्यूजेनची वचनबध्दता दर्शविते.हा पुरस्कार स्वीकारल्यावर न्युजेन इन्श्युरन्स ब्रोकिंग प्रा.लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुराग गीते म्हणाले की,दुसऱ्या लेंडटेकएक्स पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट इंशुअरटेक कंपनी म्हणून सन्मान मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे.हा पुरस्कार अद्यावत इन्श्युरन्स सोल्युशन्स प्रदान करण्यासाठीचा आमचे समर्पण आणि अभिनवता दर्शविते. इन्श्युरन्स क्षेत्रात परिवर्तन आणण्यासाठी आणि ग्राहकांना अद्वितीय मूल्य प्रदान करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

न्युजेन इन्शुरन्स ब्रोकिंग प्रा.लि.च्या व्यवस्थापकीय संचालक ईशा जैस्वाल म्हणाल्या की, इन्शुरन्स तंत्रज्ञानामध्ये अभिनव दृष्टीकोनासाठी मिळालेला हा सन्मान आनंददायी आहे.ग्राहकांना इन्शुरन्स ची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी अद्ययावत सोल्युशन्स प्रदान करण्याची आमची कटिबध्दता हा पुरस्कार दर्शविते.

लेंडटेकएक्स पुरस्काराचे उद्दिष्ट सहयोगाला प्रोत्साहन देणे,उद्योगातील मापदंड प्रस्थापित करणे,अभिनवतेला चालना देणे आणि उद्योगाचा विकास करणे हे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments