इंदौर,26 ऑक्टोबर 2024 : शक्ती पंप्स (इंडिया) लि.(एसपीआयएल) ने 30 सप्टेंबर 2024 रोजी संपलेली तिमाही व सहामाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले.
कंपनीच्या कामगिरीबाबत आनंद व्यक्त करताना शक्ती पंप्स (इंडिया) लि.चे अध्यक्ष दिनेश पाटीदार म्हणाले की,महसूलात आणि नफ्यात वाढीसह कंपनीसाठी आणखी एक अद्वितीय तिमाही निकाल जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे.यामुळे आर्थिक वर्षातील पहिली सहामाही देखील उल्लेखनीय ठरली आहे.आमची कामगिरी ही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही क्षेत्रांमधील असलेल्या ऑर्डर्सच्या जलद अमंलबजावणीचा थेट परिणाम आहे.नफा क्षमतेमध्ये देखील लक्षणीय वाढ दिसली असून याचे श्रेय तिमाही दरम्यानच्या वाढलेल्या कामकाजामुळे अर्थव्यवस्थेतील व्यापकतेला जाते.
सप्टेंबर 2024 पर्यंत सुमारे 1800 कोटी रूपयांची आर्डर बुक असून याबाबत भक्कम स्थिती दर्शविते.पीएम कुसूम योजनेतील आमचे नेतृत्वाचे स्थान पाहता आम्हाला खात्री आहे की,असाच ऑर्डर्सचा ओघ येत राहील आणि आमच्या शाश्वत वाढीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
आमचे मजबूत ऑर्डरबुक पाहता आणि अधिक ऑर्डर सातत्याने मिळविण्याच्या आमच्या यशामुळे आम्हाला खात्री आहे की,आम्ही यावर्षी अपेक्षापेक्षा चांगली कामगिरी करू.हा आत्मविश्वास आमच्या वर्तमान ऑर्डर्स कार्यक्षमतेने कार्यान्वित करण्याची आमची क्षमता दर्शवितो.याला आमच्या एकात्मिक उत्पादन क्षमतेचे पाठबळ आहे.याशिवाय आम्ही रिटेल तसेच ईव्ही व्यवसायात आमचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत,जे भविष्यात शाश्वत,आर्थिक कामगिरीसाठी योगदान देतील.
तिमाहीची प्रमुख आर्थिक ठळक वैशिष्ट्ये (एकत्रित):
तपशील (कोटी रुपये)
आर्थिक वर्ष
25 ची दुसरी तिमाही
आर्थिक वर्ष
24 ची दुसरी तिमाही
वर्षागणिक
आर्थिक वर्ष
25 ची पहिली तिमाही
तिमाही दर तिमाही
आर्थिक वर्ष
25 च्या पहिल्या सहामाहीत
आर्थिक वर्ष
24 च्या पहिल्या सहामाहीत
वर्षागणिक
कामकाजामधील महसूल
634.6
152.8
315.4%
567.6
11.8%
1,202.2
265.8
352.2%
ईबीआयटीडीए
148.7
15.2
878.4%
135.9
9.5%
284.6
23.1
1,130.3%
ईबीआयटीडीए मार्जिन
23.4%
10.0%
1,349 bps
23.9%
(50 bps)
23.7%
8.7%
1,497 bps
करपूर्व नफा
138.5
7.4
1,780.7%
125.6
10.3%
264.0
8.1
3,161.0%
करपश्चात नफ्याचे प्रमाण
101.4
5.9
1,633.3%
92.6
9.5%
194.1
6.9
2,730.0%
पीएटी मार्जिन
16.0%
3.8%
1,216 bps
16.3%
(34 bps)
16.1%
2.6%
1,357 bps
बेसिक ईपीएस (रूपये)
50.6
3.2
1,489.7%
46.2
9.5%
96.9
3.7
2,492.2%
आर्थिक निकालाची वैशिष्टये :
आर्थिक वर्ष 2025 मधील दुसऱ्या तिमाहीची वैशिष्टये
● कामकाजामधील महसूल गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत म्हणजे 152.8 कोटी रूपयांपासून 634.6 कोटी रूपयांपर्यंत वाढला आहे.
● ईबीआयटीडीए (व्याज,कर,घसारा,कर्जमाफी पूर्व उत्पन्न


