Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिल्वोस्टाईल बाय पीएनजी’ तर्फे ब्रँडचा नवा चेहरा म्हणून राशा थडानी यांची नियुक्ती

सिल्वोस्टाईल बाय पीएनजी’ तर्फे ब्रँडचा नवा चेहरा म्हणून राशा थडानी यांची नियुक्ती

पुणे, 16 जानेवारी २०२४ : ‘सिल्वोस्टाईल बाय पीएनजी’ तर्फे आगामी मोहिमांसाठी नवीन चेहरा म्हणून राशा थडानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या मोहिमेसह हा ब्रँडच्या प्रवासातील एक महत्त्वाचा क्षण असून प्रतिमा आणखी उंचावण्यात मदत होणार आहे. राशाशी सहयोग करणारा हा भारतातील पहिला ब्रँड ठरला आहे. राशा थडानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्यांची नियुक्ती म्हणजे ‘सिल्वोस्टाईल बाय पीएनजी’साठी प्रतिभा, सौंदर्य आणि आकर्षकता यांचा एक अनोखा मिलाफ आहे. राशा यांनी सिल्व्होस्टाइलच्या मोहक आणि आकर्षक अशा अद्वितीय दागिन्यांचे मनापासून कौतुक देखील केले आहे. सोशल मीडियावर, विशेषत: नव्या पिढीमध्ये आधीपासूनच एक मजबूत चाहता वर्ग असलेली राशा या वर्षातील सर्वात चर्चेत असलेल्या नवोदित कलाकारांपैकी एक आहे!

 

राशा थडानी या ब्रँडच्या उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. सिल्वोस्टाईल,आपल्या वैविध्यपूर्ण आणि ट्रेंडसेटिंग डिझाइन्स आणि असंख्य कलेक्शनसह, व्यक्तींना त्यांचे व्यक्तिमत्त्व स्वीकारण्यास आणि प्रदर्शित करण्यास सक्षम करते. प्रत्येक दागिना केवळ एक ऍक्सेसरी नसून वैयक्तिक शैलीची एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे.

 

इंडस्ट्रीतील एक नवीन चेहरा म्हणून, राशा थडानी एक तरुण उर्जा आणण्यास मदत करणार आहे. त्यांची फॅशन शैली आणि पारंपरिक आणि आधुनिक घटकांचा सहजतेने मिलाफ करण्याची क्षमता सिल्वोस्टाईलसाठी एक आदर्श चेहरा आहे.

 

 

‘सिल्वोस्टाईल बाय पीएनजी’साठी नवीन चेहऱ्याची भूमिका स्वीकारताना राशा थडानी आपले विचार व्यक्त करताना म्हणाल्या की, सिल्वोस्टाईल बाय पीएनजी हा एक तरुण ब्रँड आहे, जो शैली, दृष्टिकोन आणि वृत्ती यावर लक्ष केंद्रित करतो. मी त्यांच्यासोबतच्या या प्रवासाचा एक भाग बनण्यासाठी आणि माझ्या वैयक्तिक शैलीशी जोडणाऱ्या ब्रँडचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उत्सुक आहे. प्रत्येक दागिना एक कथा सांगतो, आणि या मोहिमेतील कथाकार बनण्याचा मला अभिमान आहे.

 

‘सिल्वोस्टाईल बाय पीएनजी’चे प्रवर्तक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, अनिल थडानी आणि रवीना टंडन यांची मुलगी राशा थडानी ही अत्यंत हुशार आहे आणि तिच्या सभोवताली प्रतिभाशाली वातावरण आहे. तिची शैली, आमच्या प्रेक्षकांशी असलेले दृढ नाते आणि पॉप कल्चरशी जुळणारे त्यांचे कौशल्य हे आमच्यासाठी एक परिपूर्ण ठरणार आहे. त्यांना आमच्या सोबत घेऊन काम करण्यास आम्‍ही खूप उत्‍सुक आहोत, आमचा विश्‍वास आहे की नव्या पिढीशी अधिक चांगल्या प्रकारे जोडले जाऊ

शकतो.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments