*
पुणे, दि. 5 :- कोथरूड विधानसभा मतदार संघातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून सदरची तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक अमित कुमार यांच्या समक्ष केली जाणार आहे.
सदरची तपासणी तीन टप्प्यात केली असून पहिली तपासणी 8 नोव्हेंबर 2024 रोजी, दुसरी तपासणी 14 नोव्हेंबर रोजी व तिसरी तपासणी 19 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता, कोथरूड विधानसभा मतदार संघाचे कार्यालय, कै. श्रीमती अनुसयाबाई खिलारे मॉडेल शाळा एरंडवणे पुणे -411004 येथे दुसऱ्या मजल्यावरील निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्षात केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे यांनी दिली आहे.


