Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorized*खडकवासला विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचे दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर*

*खडकवासला विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचे दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर*

पुणे, दि. ५ : खडकवासला विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचे दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर झाले असून ही तपासणी मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक अमित कुमार यांचे मार्फत खडकवासला मतदारसंघाच्या सिंहगड टेकनिकल कॉलेज, आंबेगाव बु. पुणे येथील निवडणूक कार्यालयातील निवडणूक खर्च व सनियंत्रण कक्षात करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी कळविली आहे.

खर्च तपासणी तीन टप्प्यात होणार असून उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी ८ नोव्हेंबर, दुसरी तपासणी १४ नोव्हेंबर रोजी तर तिसरी तपासणी १९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यत होणार आहे. तरी या दिनांकास उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत खर्च प्रतिनिधी यांनी सर्व कागदपत्रांसह निवडणूक कार्यालयातील खर्च नियंत्रण कक्षात उपस्थित रहावे, असेही डॉ. माने यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments