*
पुणे, दि. ५ : भारत निवडणूक आयोगाच्या निवडणुक खर्च संनियंत्रण यावरील अनुदेशांचा सारसंग्रहमधील लेखे तपासणीच्या तरतूदीनुसार जुन्नर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी खर्च निरिक्षकांमार्फत करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाटगे यांनी दिली आहे.
पंचायत समिती सभागृह, जुन्नर येथे ही तपासणी करण्यात येईल. खर्च तपासणी तीन टप्प्यात होणार असून उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी ९ नोव्हेंबर रोजी तर दुसरी १३ नोव्हेंबर रोजी तर तिसरी तपासणी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने दिली आहे.


