Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedजुन्नर विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून आकस्मिक भेटी देवून निवडणूक कामकाजाची पाहणी*

जुन्नर विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून आकस्मिक भेटी देवून निवडणूक कामकाजाची पाहणी*

*

पुणे, दि. ५ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या दृष्टीने जुन्नर विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाटगे यांनी स्थिर सर्वेक्षण पथकाच्या ठाणे जिल्हा हद्दीवरील खुबी येथील असलेल्या स्थळाला आकस्मिक भेट देवून पाहणी केली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर विधानसभा मतदार संघाअंतर्गत विविध कक्ष स्थापित करण्यात आले आहेत. या कक्षांकडे महत्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मतदारसंघाच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या संशयीत वाहनांची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. हद्दीत अनधिकृतपणे दारू, पैसा इत्यादींची वाहतूक होणार नाही किंवा गैरप्रकार होणार नाही याबाबत तपासणी करण्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्ष राहून कोणताही अनुचित प्रकार घडणार याची खबरदारी घेण्याच्या सूचना श्रीमती घाटगे यांनी पाहणीदरम्यान दिल्या. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन सुर्यवंशी, प्रभारी गट शिक्षण अधिकारी अनिता शिंदे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी श्रीमती घाटगे यांनी मार्गावरील निवडणूक प्रचार करणारी वाहने तसेच त्यांच्याकडील आवश्यक परवानग्या यांची देखील पडताळणी केली. खुबी येथील ठिकाणाव्यतिरिक्त त्यांनी तालुक्यातील खिरेश्वर, मढ येथील विविध मतदान केंद्रांनादेखील आकस्मिक भेटी दिल्या. मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, प्रकाश व्यवस्था, शौचालय, रॅम्प, फर्निचर इत्यादी किमान पायाभुत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निवडणूक यंत्रणांनी विहित वेळेत काम पूर्ण करावे, अशा सूचना श्रीमती घाटगे यांनी दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments