Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedमतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदार संघात जनजागृती अभियान*

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदार संघात जनजागृती अभियान*

*

पुणे, दि.६: मतदानासाठी वेळ काढा, आपापली जबाबदारी पार पाडा.., सोडा सारे काम धाम, मतदान करणे पहिले काम.., अशा घोषणा देत चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप पथकाच्या वतीने ठिकठिकाणी मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले.

यावेळी स्वीपचे समन्वय अधिकारी राजीव घुले, स्वीप पथकातील दिपक यन्नावार, मनोज माचरे, अंकुश गायकवाड, गणेश लिंगडे, प्रिन्स सिंह, सचिन लोखंडे, पांडुरंग जाधव, पल्लवी गायकी, ज्योती पाटील, संजू भाट, विजय वाघमारे उपस्थित होते.

२०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपमार्फत विविध ठिकाणी मतदान जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत निसर्ग कॉलनी , वैद वस्ती, जिजाऊ पर्यटन केंद्र, मोरया गोसावी समाधी मंदिरा जवळ चिंचवडगाव या ठिकाणी मतदान जनजागृती कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. यावेळी उपस्थितांना मतदानाची शपथ देण्यात आली.

मतदान प्रक्रियेविषयी जागरूकता वाढविणे, त्या प्रक्रियेचे ज्ञान प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचविणे, मतदान प्रक्रियेत सामान्य मतदाराचा सहभाग वाढविणे, लोकशाहीला खऱ्या अर्थाने लोकसहभागात्मक लोकशाही बनविणे हा या अभियान राबविण्याचा उद्देश असल्याचे सांगून ईव्हीएम व व्हीव्हीपॅटसंदर्भात माहिती श्री. घुले यांनी दिली.

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments