Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्व- रूपवर्धिनी संस्था आणि आशा पापळ यांना मोहिते प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर अंजनीबाई...

स्व- रूपवर्धिनी संस्था आणि आशा पापळ यांना मोहिते प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर अंजनीबाई विठ्ठलराव मोहिते प्रतिष्ठान तर्फे माऊली आणि प्रेरणा पुरस्कारांची घोषणा

पुणे : अंजनीबाई विठ्ठलराव मोहिते प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणाऱ्या माऊली पुरस्कार आणि प्रेरणा पुरस्काराचे आयोजन १८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल येथे करण्यात आले आहे. यंदाचा पुरस्कार स्व-रूपवर्धिनी संस्था आणि आशा पापळ यांना प्रदान करण्यात येणार आहे.

 

पुरस्कार वितरण समारंभासाठी पिंपरी चिंचवडचे सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पराग काळकर उपस्थित राहणार आहेत.

 

युवा उद्योजक राहुल पापळ यांच्या मातोश्री आशा पापळ यांना माऊली पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, तर आर्थिक, दुर्बल गटातील मुलांसाठी बालवाडी वर्ग, वस्तीतील शालेय मुलांसाठी दैनंदिन शाखा, अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा केंद्र, स्त्रियांसाठी बचत गट, प्रशिक्षण केंद्र असे अनेक काम करणाऱ्या स्व-रूपवर्धिनी संस्थेला प्रेरणा पुरस्कार देण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments