Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedभागवत दर्शन सप्ताह आजपासून (दि.१६) राष्ट्रीय कीर्तन सम्राट कै. गोविंद स्वामी आफळे...

भागवत दर्शन सप्ताह आजपासून (दि.१६) राष्ट्रीय कीर्तन सम्राट कै. गोविंद स्वामी आफळे व कै. सौ. सुधा गोविंद आफळे यांच्या स्मृती निमित्त आयोजन

पुणे : राष्ट्रीय कीर्तन सम्राट कै. गोविंद स्वामी आफळे व कै. सौ. सुधा गोविंद आफळे यांच्या स्मृती निमित्त दिनांक १६ ते २२ नोव्हेंबर दरम्यान भागवत दर्शन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सदाशिव पेठेतील नारद मंदिर येथे दररोज सायंकाळी ६ वाजता भागवत कथा संपन्न होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांनी दिली.

प्रवचनकार बाळकृष्ण लक्ष्मणराव चौथवे (नांदेड) सप्ताहात निरूपण करणार आहेत. आपल्या संस्कृतीत भक्तीची शिकवण देणारा भागवत ग्रंथ आहे. त्यातील भक्तिसूत्रे आणि तत्त्वज्ञान याचे चिंतन अधिक प्रमाणात व्हायला हवे, यासाठी या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शुद्ध निखळ भागवत ग्रंथातील तत्त्वज्ञानाचे विवरण या भागवत सप्ताहात होणार आहे, असेही आफळे यांनी सांगितले.


Regards,

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments