सातारा.15… आपली कर्तव्य आणि कर्म करताना त्यामध्ये योग्य मार्गाने केले तर आपल्याला अनुग्रह मिळतो. आज महाभारतात आणि वेदांनीही असे सांगितले आहे की संपूर्ण राष्ट्राच्या संरक्षणाचे जबाबदारी ही वेदमंत्र म्हणणाऱ्या ब्राह्मण तसेच क्षेत्रीयांवर आहे . कारण ते जाणकार आहेत. पशुपालनाचे काम वैशांकडे दिले आहे. तर बाकीची सेवा आणि सत्ता केंद्र पार पाडत असताना आज संपूर्ण देशात सुरू असलेले गोपालनाचे कार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. लोक आपल्या कर्तव्यात कमी पडले तर त्यांना दंडित करण्याचे काम क्षत्रियांनी करावयाचे आहे. आणि असाच क्षत्रधर्म प्रभू रामचंद्रांनी आपल्याला शिकविला .दंडाच्या भीतीनेच आपण आपल्या कार्यात व्यवस्थितपणा आणावा. आज कार्यकर्ता हा भगवान विष्णूंचा अवतार आहे .जग हे स्वच्छंदी चालणारे आहे. कर्तव्यात कसूर झाली तर दंड करण्यासाठी राज्यकर्ते आहेत आणि आपण आपले कर्म योग्य केले तर भगवान प्रसन्न होतात असे विचार वाराणसी येथील प्रथम महाविभूती पंडित प्रवर परमपूज्य गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी काढले.
सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या आयोजित सोहळ्यात तसेच विष्णू पंचायतन यागाचे उद्घाटना निमित्त आयोजित समारंभात द्रविड शास्त्री यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले .
याप्रसंगी श्री समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस ,ज्येष्ठ निरूपणकार श्रीमती मंदाताई गंधे, मंडळाचे कार्यवाह योगेश बुवा रामदासी ,रामदास स्वामी संस्थानचे प्रमुख विश्वस्त बाळासाहेब स्वामी, दक्षिणेतील वेदमूर्ती वंशीकृष्ण शास्त्री तसेच वेदमूर्ती विशाल कुलकर्णी गुरुजी या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती व्यासपीठावर होती .अतिशय सुरेख अशा अयोध्येतील श्री राम मंदिराची प्रतिकृती बनवलेल्या या सभामंडप स्थळी उद्घाटनानिमित्त भव्य महारांगोळ्या तसेच फुलांचे आणि केळींच्या पानांचे सुशोभीकरण लक्षवेधक ठरत होते . पुणे येथील सुप्रसिद्ध सनई वादक पं.प्रमोदराव गायकवाड यांच्या सुरेल सनई वादनाने या सोहळ्याचे आकर्षण ठरल्यानंतर या उद्घाटन सोहळ्यापूर्वी विष्णू पंचायतन मूर्ती तसेच मान्यवर ग्रंथांची मिरवणूक श्रीधर कुटीतून मंडप स्थळावर काढण्यात आली .शिंग,तुताऱ्यांच्या निनादात श्री अयोध्या येथील रामरायाचे मंदिराची प्रतिकृती असलेल्या या सभा मंडपात गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी प्रथम अवतरण केल्यावर या सर्व मान्यवरांनी प्रभू रामरायाच्या मूर्तीचे पूजन करून दीप प्रज्वलन केले. वेदमूर्तींनी वेदमंत्रांच्या जयघोषात शांतीमंत्र पठण केल्यानंतर या कार्यक्रमा गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी उपस्थित भक्तांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस म्हणाले की, आज हे अहोभाग्य मला अनुभवता येत आहे. कारण सज्जनगडावर रामलल्ला हजर झाला आहे. आपल्याला देहाचे मंदिर बनवायचे आहे. त्यासाठी आपली शरीर आधी स्वच्छ करायला हवे.स्वतः रामराया आपल्याला सुहास्य अशा वदनाने आपल्या दर्शनासाठी इथे अवतरला असून त्याला नजरेत साठवून ठेवून आपण आपल्या जीवनाची वाटचाल करावी.
मी अध्यक्ष असलो तरी केवळ सह्याजीराव आहे. कार्य करण्याचे सर्व परिश्रम हे कार्यकर्ते आणि मान्यवर घेत आहेत .
मंडळाच्या या वाटचालीत आपणा सर्वांची सदैव साथ हेच मोठे आनंदनीय असे आहे. यावेळी वेदमूर्ती वंशीकृष्ण शास्त्री यांनी राज्य रक्षणाची जबाबदारी राजाची असते. त्यासाठी भगवान रामासारखा राजा हवा ,आज राज्याला चांगले ब्राह्मण, पुरोहित असतील तर हीच खरी राज्याची संपत्ती आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे एकमेव असे राजे होऊन गेले आणि त्यांच्या अतिशय सुरेख अशा मार्गदर्शनपर वाटचालीवर आपण सर्वांनी आपल्या जीवनाची वाटचाल करायला हवी.
रामदास स्वामी संस्थांनचे विश्वस्त बाळासाहेब स्वामी म्हणाले की आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून मला मंडळाच्या निर्मितीपासूनचे सर्व स्मृती जाग्या झाल्या .अनेक मान्यवर समर्थ भक्तांच्या कार्यातून हे आज संस्थेचे कार्य वृद्धिंगत होत आहे याचा आनंद वाटतो.
श्रीमती मंदाताई गंधे यांनी यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना अमृत महोत्सवी सोहळ्यासाठी मंडळाने उभारलेला हा अयोध्येचा राम मंदिर प्रतिकृतीचा सभामंडप हा खरोखर आनंदोत्सव साजरा करणारा आहे हे समर्थांचे कार्य पाहिल्यानंतर मंडळ सतत कार्यरत आहे .त्यास संत, महात्मे यांचा मोठा कृपाशीर्वाद ,जनतेचा अनुकूल प्रतिसाद तसेच सद्गुरू श्रीधर स्वामींचे व समर्थांचे आशीर्वाद लाभत असून कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचे हे चीज आहे .लवकरच हे मंडळ आपली शताब्दी यशस्वीपणे साजरी करेल यासाठी सर्वांकडून मी शुभेच्छा अपेक्षित करते असे उद्गार काढले .यावेळी वेदमूर्ती विशाल कुलकर्णी यांनी 400 वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या दासबोधाचे आजही तितक्याच मोठ्या प्रमाणात होत असलेले प्रचार व प्रसाराचे कार्य यापुढे चार लाख वर्षेही सुरू राहील. समर्थ सेवा मंडळ हे दान, धर्म, यज्ञ असे उदंड कार्य करत असून यासाठी संत महात्म्यांचे मिळालेले आशीर्वाद हे मंडळाचे कार्य वृद्धिंगत करणारे आहे असे सांगितले. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजेयबुवा रामदासी यांनी केले .मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांनी सर्वांचे आभार मानले.
या सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार मंडळाच्या वतीने रामनामी शाल रामरायाच्या मूर्तीची सुरेख प्रतिकृती आणि पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन योगेशबुवा रामदासी व गुरुनाथ महाराज कोटणीस यांच्या हस्ते करण्यात आला
विष्णू पंचायतन यागाच्या यज्ञ शाळेतील सर्व धार्मिक कार्यक्रमांचे नियोजनासाठी वेदमूर्ती विशाल निमकर ,सिद्धांत गाडगीळ व विशाल कुलकर्णी हे परिश्रम घेत असून अयोध्या राम मंदिराच्या मंदिर प्रतिकृती उभारणीसाठी सुनील निमकर व हेमंत उपाध्ये हे मुंबई येथून आपल्या सर्व टीमसह गेले 28 दिवस अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
दुपारच्या सत्रात परम श्रद्धेय मंदाताई गंधे यांचे प्रवचन झाल्यानंतर सायंकाळी पुणे येथील समर्थ भक्त मकरंद बुवा रामदासी यांचे सुश्राव्य कीर्तन झाले .रात्री नऊ वाजता नरसोबाची वाडी येथील पंडित कृष्णेद्र वाडीकर यांची गायन सेवा संपन्न झाली .शनिवार दिनांक 16 रोजी अयोध्या राम मंदिराचे कोषाध्यक्ष परम आदरणीय श्रीमद गोविंद गिरी महाराजांचे सज्जनगडावर आगमन होऊन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांची नाणी तुला मंडळाचे वतीने करण्यात येणार असून त्यानंतर त्यांचे मार्गदर्शनपर प्रवचन होणार आहे. तसेच कर्नाटकातील माणिक नगर येथील माणिक प्रभू संस्थानचे प्रमुख पीठाधीपती श्रीमद ज्ञानराज प्रभू महाराजांचे ही शनिवारी गडावर आगमन होणार आहे.
शनिवार दि. 16 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात ते दुपारी एक या वेळेत अग्निस्थापना आणि यज्ञास प्रारंभ होणार आहे .त्यानंतर सकाळी नऊ ते साडेदहा या वेळेत पुणे येथील परमपूज्य गोविंद देवगिरी महाराज यांचे प्रवचन होणार असून सकाळी 11 ते 12:30 या वेळेत वाराणसी येथील पंडित प्रवर परमपूज्य गणेश्वर शास्त्री द्रविड यांचे प्रवचन होणार आहे. दुपारी चार वाजता देगलूर येथील ह. भ. प .गाथामूर्ती परमपूज्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे वारकरी सांप्रदायिक कीर्तन होणार आहे. रात्री नऊ ते अकरा या वेळेस सुप्रसिद्ध गायक पंडित संजीव अभ्यंकर यांची गायन सेवा सादर होणार आहे.
======
संपूर्ण देशाच्या संरक्षणाची जबाबदारीचे काम जाणकारांकडे.. गणेशशास्त्री द्रविड. सज्जनगड येथील विष्णू पंचायतन याग व अमृतमहोत्सवी सोहळ्यास उत्साहात प्रारंभ . शनिवारी सोहळ्यात श्रीमद गोविंदगिरी महाराजांची होणार नाणीतुला, माणिक नगरच्या ज्ञानराज प्रभूंचे होणार आगमन
RELATED ARTICLES


