Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedबारामती, हेमराज उपांत्य फेरीत एन. बी. ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा : निलेश...

बारामती, हेमराज उपांत्य फेरीत एन. बी. ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा : निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजन

पुणे : बारामती स्ट्रायकर्स, हेमराज मृत्युंजय या संघांनी निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित पुणे जिल्हा टेनिस प्रीमियर एन. बी. ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

वडगाव बुद्रुक येथील सिंहगड रोडवरील मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. पहिल्या उपांत्य लढतीत बारामती ब्लास्टर्स संघाने शिरसाठ स्पोर्ट्स संघावर आठ गडी राखून मात केली. शिरसाठ संघाला निर्धारित ८ षटकांत ३ बाद ८७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल बारामती संघाने विजयी लक्ष्य ६.३ षटकांत दोन गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले. यात सलामीवीर चेतन कलांगेने १८ चेंडूंत पाच चौकार व दोन षटकारांसह नाबाद ४३ धावा केल्या.

दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत हेमराज मृत्युंजय संघाने इशिका इलेव्हन संघावर तीन गडी राखून मात केली. इशिका संघाला निर्धारित ८ षटकांत ८ बाद ८८ धावाच करता आल्या. हेमराज मृत्युंजय संघाने विजयी लक्ष्य ७.३ षटकांत सात गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले.

संक्षिप्त धावफलक – शिरसाठ स्पोर्ट्स – ८ षटकांत ३ बाद ८७ (आनंद चौहान ३५, विशाल निघोत २१, मयूर करांडे २०, अक्षय तावरे १-२५, संतोष लष्कर १-५) पराभूत वि. बारामती ब्लास्टर्स – ६.३ षटकांत २ बाद ८८ (चेतन कलांगे नाबाद ४३, नवाज शेख १५, अक्षय तावरे १३, संतोष लष्कर नाबाद १४, संदीप गिरहे १-१३, रणजित फराटे १-२१).

इशिका इलेव्हन – ८ षटकांत ८ बाद ८८ (शफिक शेख ३२, आदिल २१, असिफ सय्यद नाबाद ११, ओंकार साळुंके २-२३, वसिक शेख २-१५, झहीर खान १-३१, अनिकेत ताकवने १-४) पराभूत वि. हेमराज मृत्युंजय – ७.३ षटकांत ७ बाद ९० (महेश नानगुडे २८, विशाल सरकार १८, मनोज साठे नाबाद १९, ओंकार गायकवाड २-१४, ऋषिकेश ढोबळे २-१७).

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments