Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedत्रिपुरी पौर्णिमेनिमित्त महालक्ष्मी मंदिरात ५१ हजार पणत्यांचा दीपोत्सव* श्री महालक्ष्मी मंदिर...

त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त महालक्ष्मी मंदिरात ५१ हजार पणत्यांचा दीपोत्सव* श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे पुष्परंगावलीतून पंचमहाभूतांचे रेखाटन

*

पुणे : सारसबागेजवळील श्री महालक्ष्मी मंदिरात त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण मंदिरात तब्बल ५१ हजार दीप प्रज्वलित करण्यात आले. आकर्षक रंगातील पणत्यांसह हजारो दिव्यांची आरास, विविध रंगातील फुलांची सजावट आणि पुष्परंगावलीतून पंचमहाभूतांचे रेखाटन देखील यानिमित्ताने देण्यात आला.

श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, डॉ.तृप्ती अग्रवाल यांसह विश्वस्त, पदाधिकारी व भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. विश्वकर्मा विद्यापीठ व विश्वकर्मा विद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी व प्राचार्य यांनी संयोजनात सहभाग घेतला.

अमिता अग्रवाल म्हणाल्या, पंचमहाभूत म्हणजे, आपण ज्याचा एक भाग आहोत. अशी दृष्य सृष्टी ज्या पाच मूलतत्वांनी बनलेली आहे, ती पाच तत्वे म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या पंचमहाभूतांची माहिती यानिमित्ताने रंगावलीतून देण्यात आली. तसेच विविधरंगी दीप प्रज्वलित करुन संपूर्ण मंदिराप्रमाणे समाजातील अज्ञानरुपी आणि विकाररुपी अंध:कार दूर व्हावा, अशी प्रार्थना देखील मातेचरणी करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments