Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात विष्णू सहस्त्रनाम पारायण संपन्न ३०० हून अधिक महिलांचा...

श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात विष्णू सहस्त्रनाम पारायण संपन्न ३०० हून अधिक महिलांचा सहभाग

पुणे : सदाशिव पेठेतील पेशवेकालीन श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात श्री विष्णू सहस्त्रनामाचे पारायण झाले. यावेळी ३०० हून अधिक महिलांनी एकत्र येत पारायण केले.

विद्या बेळांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णू सहस्त्रनामाचे पारायण झाले. श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात ११ एकादशी च्या दिवशी श्री विष्णू सहस्त्रनाम पारायणाचा संकल्प करण्यात आला होता, त्याची सांगता विष्णू याग करून मंदिरात झाली.

विद्या बेळांबे म्हणाल्या, गीता फाउंडेशनचे आपटे गुरुजी यांनी एकूण १२ कोटी विष्णू सहस्त्रनाम पठणाचा संकल्प केला आहे. त्यातील १० कोटी विष्णुसहस्त्रनाम पठण झाले आहे. विष्णू सहस्रनाम पठण हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हे स्तोत्र भगवान विष्णूंच्या १ हजार नावांचे वर्णन करते आणि त्याचा जप केल्याने मनशांती, आध्यात्मिक प्रगती आणि संकटापासून मुक्तता मिळते. विष्णुसहस्त्रनाम पठणातील मंत्र संस्कृत भाषेत आहेत ज्यांचे उच्चार विशिष्ट कंपन निर्माण करतात यामुळे शरीरातील ताण कमी होते आणि मानसिक शांती मिळते. विष्णू सहस्त्रनाम पठणामुळे सकारात्मक ऊर्जा देखील मिळते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments