Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedमतदार राजा जागा, हो लोकशाहीचा धागा हो' श्री शिवाजी मराठा मुलींच्या शाळेत...

मतदार राजा जागा, हो लोकशाहीचा धागा हो’ श्री शिवाजी मराठा मुलींच्या शाळेत मतदार जागृती अभियान

पुणे : श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या जिजामाता मुलींचे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मतदार जागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी शिक्षक विद्यार्थिनी आणि पालकांनी मतदान जागृतीसाठी सामूहिक शपथ घेतली. ‘मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो’ घोषणा देत व हातात फलक घेऊन विद्यार्थिनींनी आजूबाजूच्या परिसरात मतदानाचे महत्त्व पटवून दिले.

यावेळी जिजामाता हायस्कूलच्या मुख्याध्यापिका समीक्षा सांडभोर, उपप्राचार्य सीमा गोळे यांनी मार्गदर्शन केले. प्रशालेच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपक्रमात उत्साहाने सहभागी झाले.

यानिमित्ताने पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींची रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. मतदार जागृती अभियाना अंतर्गत विद्यार्थिनींनी शुक्रवार पेठेत पदयात्रा काढली यामध्ये घोषणा देत आणि हातात मतदान जागृतीचे फलक घेत मतदानाचे महत्त्व लोकांना पटवून दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments