Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedमतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल नेण्यास प्रतिबंध- अनिल पवार*

मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल नेण्यास प्रतिबंध- अनिल पवार*

*

पुणे, दि.१७ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आवारात मतदान केंद्र अध्यक्ष, सूक्ष्म निरीक्षक सोडून उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी, मतदार आदींना मोबाईल नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मतदार केंद्रावर मोबाईल सापडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात ५६४ मतदान केंद्रे असून ६ लाख ६३ हजार ६२२ मतदार आहेत. यामध्ये ३ लाख ४८ हजार ४५० पुरुष, ३ लाख १५ हजार ११५ महिला, तर ५७ तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. या मतदान केंद्रावर छायाचित्रीकरण करण्यास बंदी असून मोबाईल, स्मार्टफोन, स्मार्टवॉच, वायरलेस सेट यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

मतदानाच्या दिवशी अनावधानाने एखाद्या मतदाराने मोबाईल मतदान करण्यासाठी सोबत आणल्यास मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या अंतरावर ठेवावा लागेल. सर्व उमेदवार आणि मतदारांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करावे, असे निर्देशही निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिले आहेत.

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments