पुणे, भारत । १८ नोव्हेंबर २०२४ । शेफलर इंडिया या आघाडीच्या मोशन टेक्नॉलॉजी कंपनीने ‘बडी४स्टडी फाऊंडेशन’सोबत सहयोगाने ‘शेफलर इंडिया सोशल इनोव्हेटर फेलोशिप प्रोग्राम’च्या २०२४ एडिशनच्या विजेत्यांची घोषणा केली आहे. अव्वल दहा विजेत्यांपैकी महाराष्ट्रातील पुणे येथील दोन प्रेरणादायी चेंजमेकर्स – रविंद्र जोशी आणि महेश शिंदे यांना अनुक्रमे इलेक्ट्रिक व ऐरोस्पेस उपयोजनांमधील दुर्मिळ अर्थ-फ्री मोटर्स आणि जैव-कचऱ्याचे पुनर्चक्रण करण्यासाठी बीएसएफ शेतीची अंमलबजावणी करण्यामधील त्यांच्या प्रकल्प इनोव्हेशन्ससाठी सन्मानित करण्यात आले आहे.
सोशल इनोव्हेटर फेलोशिप प्रोग्रामचा मोठ्या प्रमाणात समाजावर सकारात्मक परिणाम घडवून आणण्यासोबत त्यांना फायदा देण्याची क्षमता असलेले अद्वितीय शाश्वत सोल्यूशन्स विकसित करणाऱ्या सामाजिक उद्योजकांना प्रशंसित आणि पुरस्कारित करण्याचा मनसुबा आहे. हा प्रोग्राम शेफलर इंडियाचा प्रमुख कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रम होप (HOPE)चा भाग देखील आहे, ज्यामुळे आरोग्यसेवा, व्यावसायिक कौशल्य विकास, वारसा व पर्यावरणाचे जतन आणि समाजाच्या सक्षमीकरणाप्रती त्यांची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.
आपल्या तिसऱ्या एडिशनला साजरे करत यंदाच्या फेलोशिप प्रोग्राने आयआयटी, आयआयएम, एनआयटी, ना-नफा तत्त्वावरील संस्था आणि सुरूवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप्स अशा विविध संस्थांमधील १८ ते ३५ वर्ष वयोगटातील अर्जदारांना सहा प्रमुख श्रेणींमध्ये त्यांच्या संकल्पना व प्रोटोटाइम सोल्यूशन्स सादर करण्याचे आवाहन केले. यामध्ये पर्यावरणीय शाश्वतता, नवीकरणीय ऊर्जा, कार्बन न्यूट्रॅलिटी, चक्रीय अर्थव्यवस्था, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि सामाजिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा उपयोग यांचा समावेश आहे.
पात्र सहभागींमध्ये व्यक्ती किंवा समूहांचा समावेश होता, ज्यांची कठोर तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये शिस्तबद्ध मूल्यांकन आणि लाइव्ह व्हिडिओ प्रोटोटाइप प्रात्यक्षिकांच्या विविध फेऱ्यांचा समावेश होता.
अव्वल १० अपवादात्मक प्रकल्पांना प्रत्येकी दीड लाख रूपयांचे फेलोशिप अनुदान देण्यात आले. तसेच, विजेत्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबादने स्थापना केलेली स्टार्टअप इन्क्यूबेटर आयआयएमए व्हेंचर्स (पूर्वीची आयआयएमए-सीआयआयई) येथे २४-वीक हायब्रिड मेन्टोरशीपसह सन्मानित करण्यात आले. विजेत्यांना शेफरल इंडियाच्या प्रोग्रामधील उद्योग सहयोगी व फेलो इनोव्हेटर्सच्या नेटवर्कशी कनेक्ट होण्याची आणि त्यामधून फायदा घेण्याची संधी देखील मिळाली.
जुलै २०२४ मध्ये नोंदणीला सुरूवात झाल्यापासून प्रोग्रामला २५ हून अधिक राज्यांसह ईशान्य, पश्चिम बंगाल, जम्मू व काश्मीर येथून २७६ हून अधिक नोंदणी मिळाल्या आहेत, तसेच मूल्यांकनासाठी ७८ शॉर्टलिस्ट केलेले अर्जदर आहेत.
शेफलर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष कदम यांनी सकारात्मक परिवर्तनासाठी स्रोत म्हणून मोशन टेक्नॉलॉजीवरील कंपनीच्या फोकसवर भर दिला आणि म्हणाले, ‘’शेफलर इंडियामध्ये आम्ही शाश्वत, कार्यक्षम व स्थिर विश्वाला चालना देण्यासाठी गतीशीलतेला प्रगत करण्याप्रती कटिबद्ध आहोत. यंदाच्या सोशल इनोव्हेटर फेलोशिप प्रोग्रामप्रती उल्लेखनीय प्रतिसादामधून भारतातील तरूणांची परिवर्तनात्मक बदलाचे एजंट्स असण्याची क्षमता दिसून येते. शाश्वतता व नाविन्यता एकमेकांशी संलग्न आहेत आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही तरूण इनोव्हेटर्सना निपुण करण्याप्रती कटिबद्ध आहोत, जे व्यक्ती व पर्यावरण प्रगत होऊ शकतील असे भारताचे भविष्य घडवण्यास साह्य करतील.’’
सोशल इनोव्हेटर फेलोशिप प्रोग्राममधून सामाजिक आव्हानांचे निराकरण करण्यासाठी आणि अर्थपूर्ण परिवर्तनाला चालना देण्याकरिता नाविन्यपूर्ण सोल्यूशन्सचा वापर करत प्रभावी सामुदायिक विकासाला चालना देण्यासाठी शाश्वतता व नाविन्यतेला एकत्र करण्याप्रती शेफलर इंडियाची कटिबद्धता दिसून येते. शाश्वततेसंदर्भातील आव्हानांचे निराकरण करणाऱ्या इनोव्हेशनला पाठिंबा देत कंपनी आपले तंत्रज्ञान नेतृत्व प्रगत करण्यासोबत भारताच्या व्यापक पर्यावरणीय व सामाजिक ध्येयांप्रती योगदान देखील देत आहे.
इंडिया अॅक्सेलरेटरचे सह-संस्थापक व भारत व्हेंचर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मुनिष भाटिया आणि सीएक्सओ अॅडवायजर व मेन्टोर श्री. प्रवीण भडद, तसेच शेफलर इंडियाच्या लीडरशीप टीमने उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
शेफलर इंडियाची सामाजिक नाविन्यतेप्रती समर्पिता या प्रोग्रामपलीकडे जाते. आपला सीएसआर उपक्रम होप (HOPE) च्या माध्यमातून कंपनी समुदायांना सक्षम करण्यासाठी सतत नवीन मार्गांचा शोध घेत आहे. कंपनी आपल्या शाश्वतता ध्येयांशी संलग्न उपक्रमांमध्ये देखील सक्रियपणे सामील आहे, जसे वंचित समुदायांमध्ये एसटीईएम शिक्षणाचा प्रसार करणे, जल संवर्धन, कृषी वनीकरण व हवामान स्थिरता कृषीला पाठिंबा देणे आणि सामुदायिक आरोग्याप्रती योगदान देणाऱ्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणे; या उपक्रमांमधून प्रगती व सामाजिक आरोग्याला चालना देण्यासाठी शाश्वत पद्धतींसह मोशन टेक्नॉलॉजीला एकीकृत करण्याचा शेफलरचा व्यापक दृष्टिकोन दिसून येतो.
फोटोमथळा: महेश शिंदे (डावीकडे) आणि रविंद्र जोशी (उजवीकडे): पुण्यातील शेफलर सोशल इनोव्हेटर फेलोशिप प्रोग्राम २०२४ चे विजेते
फोटोचे श्रेय: शेफलर इंडिया
शेफलर ग्रुप (Schaeffler Group) – आम्ही गतीशीलतेमध्ये अग्रस्थानी आहोत
शेफलर ग्रुप ७५ वर्षांपासून मोशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातील उल्लेखनीय हस्तक्षेप आणि विकासांना पुढे घेऊन जात आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, उत्पादने व इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी सेवा, कार्बन डायऑक्साइड-कार्यक्षम ड्राइव्ह्ज, चेसिस सोल्यूशन्स आणि नवीकरणीय ऊर्जांसह कंपनी गतीशीलतेला संपूर्ण जीवनचक्रादरम्यान अधिक कार्यक्षम, सर्वोत्तम व शाश्वत करण्यासाठी विश्वसनीय सहयोगी आहे. शेफलर बेअरिंग सोल्यूशन्स व सर्व प्रकारच्या लिनियर गाइडस सिस्टम्सपासून दुरुस्ती व देखरेख सेवांपर्यत आठ उत्पादन फॅमिलींच्या माध्यमातून मोबिलिटी इकोसिस्टममध्ये उत्पादने आणि सेवांची सर्वसमावेशक श्रेणी देते. शेफलर ५५ देशांमध्ये २५० हून अधिक ठिकाणी जवळपास १२०,००० कर्मचाऱ्यांसह कार्यरत आहे आणि जगातील सर्वात मोठी कुटुंबाच्या मालकीची कंपनी, तसेच जर्मनीमधील सर्वात नाविन्यपूर्ण कंपनी आहे.
शेफलर इंडिया लिमिटेड
शेफलर इंडिया भारतातील बाजारपेठेत मोशन टेक्नॉलॉजीमधील नाविन्यतेचा ७५ वर्षांचा जागतिक वारसा घेऊन येते, तसेच अचूक इंजीनिअरिंग सोल्यूशन्स देते. गतीशीलतेला संपूर्ण जीवनचक्रादरम्यान अधिक कार्यक्षम, सर्वोत्तम आणि शाश्वत करण्यासाठी विश्वसनीय सहयोगी शेफलर नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, उत्पादने व इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी सोल्यूशन्स, कार्बन डायऑक्साइड-कार्यक्षम ड्राइव्ह्ज, चेसिस सोल्यूशन्स आणि नवीकरणीय ऊर्जां देते. भारतात (पुणे, सावली, मनेजा व होसूर) चार उत्पादन प्लांट्स, तीन आरअँडडी केंद्रे, आठ विक्री कार्यालये आणि प्रबळ औद्योगिक व ऑटोमोटिवह ऑफ्टरमार्केट नेटवर्कसह शेफलर इंडिया ग्राहकांना उत्पादने व सेवांच्या देशव्यापी उपलब्धतेची खात्री देते.
प्रतिष्ठित उत्पादन ब्रॅण्ड्स आणि बेअरिंग सोल्यूशन्स व लिनियर गाइडस सिस्टम्सपासून दुरुस्ती व देखरेख सेवांपर्यत आठ मोशन फॅमिलींच्या माध्यमातून मोबिलिटी इकोसिस्टममधील उत्पादने व सेवांच्या सर्वसमावेशक श्रेणीसह शेफलर विभागातील ग्राहकांसोबत सहयोग करत त्यांच्या इंजीनिअरिंग व मोशन टेक्नॉलॉजी गरजांची पूर्तता करण्याप्रती कटिबद्ध आहे. ६० वर्षांहून अधिक काळापासून भारतात उपस्थिती आणि ३,००० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या समर्पित कर्मचारीवर्गासह शेफलर भारतातील आघाडीची मोशन टेक्नॉलॉजी कंपनी आहे.


