Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedअयोध्येत पुणेकरांचे भव्य सामूहिक रामरक्षा पठण आणि बालचमूंचे गीत रामायण ग्रंथ...

अयोध्येत पुणेकरांचे भव्य सामूहिक रामरक्षा पठण आणि बालचमूंचे गीत रामायण ग्रंथ पारायण दिंडी आणि चौफेर प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजन : २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी पठण

पुणे : राष्ट्र मंदिर पुनर्निर्माणासाठी, असुर,अधर्म प्रवृत्ती नाश करून धर्म संस्थापनेसाठी, संघटित शक्तीच्या हुंकारासाठी, दिव्य सांस्कृतिक परंपरेचे संवर्धन करण्यासाठी, वसुंधरा व सर्व प्राणीमात्रांसह विश्व कल्याण असे ५ संकल्प करून पुण्यातील बालचमू भव्य रामरक्षा पठण आणि गीत रामायण सादरीकरण अयोध्या राम मंदिरात करणार आहेत. तब्बल १३ लक्ष रामरक्षा स्तोत्र पठण संकल्पपूर्ती २२ व २३ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. यावेळी हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये गीतरामायणाचे सादरीकण होणार आहे. अशी माहिती ग्रंथ पारायण दिंडीचे प्रमुख वीरेंद्र कुंटे यांनी दिली.

कार्यक्रमात ८ ते १४ वयोगटातील बालकलाकार गुरु व गायिका भाग्यश्री केसकर व गायिका पल्लवी पोटे यांच्या नेतृत्वात मराठीतून तसेच गोव्यातील दत्तप्रसाद जोग, मनोज गणपुले,किशोर भावे,हर्षा गणपुले, सतीश हेगडे, मंजिरी जोग, मकरंद जोग हे हिंदीतून प्रथमच एकत्र गीतरामायणचा सादर करणार आहेत. पुण्यात घरोघरी आणि तुळशीबाग मंदिरात वर्षभर राम रक्षा पठण झाले होते.

दिनांक २२नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता प्रथमच हिंदी व मराठी भाषेतून गीत रामायण सादरीकरण होणार आहे. दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता रामरक्षा पठण होणार आहे.

गोजिरी चित्राव, मिहीर चित्रा, लास्यवी कोंडो (गोळवलकर गुरुजी विद्यालय), अरीयाना नातू (विखे पाटील मेमोरियल स्कूल), अयान पत्की,निखिल दामले, आरुष खानझोडे (डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल प्रायमरी), मुक्ता विधाते (ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल), राधा धर्माधिकारी, ओम धर्माधिकारी, अरिया संघवी (अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम प्राइमरी स्कूल), दिव्या केळकर, वेद अकोलकर (बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल), कौमुदी देशपांडे (द स्कूल केएफआय, तामिळनाडू), जिया लोढा (सेंट मेरीज स्कूल), स्पृहा जोशी (वापी पब्लिक स्कूल), देवश्री करमरकर (अहिल्यादेवी हायस्कूल) गायन करणार आहेत. सिद्धार्थ कुंभोजकर, मनोहर अत्रे, अदिती केसकर, आशिष केसकर वादन करणार आहेत.

चितळे बंधू मिठाईवाले, एम. व्ही. टिळे, शालगर होजिअरी, महालक्ष्मी सिल्क, डॉ. प्रशांत सुरु यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहाय्य केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments