Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedदेखभाल अभियंत्यांची तुकडी तयार करण्यासाठी, प्रगतीशील फ्लीट विस्ताराला समर्थन देण्यासाठी एअर इंडिया...

देखभाल अभियंत्यांची तुकडी तयार करण्यासाठी, प्रगतीशील फ्लीट विस्ताराला समर्थन देण्यासाठी एअर इंडिया ग्रुप बेंगळुरूमध्ये विमान देखभाल प्रशिक्षण संस्थेची सुरुवात करेल

DGCA द्वारे प्रमाणित एकात्मिक 2+2 वर्षांचा एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग (AME) प्रोग्राम संस्था ऑफर करेल,
एअर इंडिया समूहाला स्वावलंबी बनवत 2026 च्या मध्यापर्यंत विमान देखभाल अभियंत्यांची गरज पूर्ण करणे

गुरुग्राम, 22 नोव्हेंबर 2024: भारतातील अग्रगण्य जागतिक विमान कंपनी, एअर इंडिया, मूलभूत देखभाल प्रशिक्षण संस्था (BMTO) ची स्थापना करत आहे, जी भारतीय विमान वाहतूक नियामक संचालनालय डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनद्वारे (DGCA) प्रमाणित 2+2 वर्षांचा एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग (AME) कार्यक्रम सादर करेल.

एअर इंडिया बीएमटीओ हे भारतात एक मजबूत आणि भविष्यासाठी तयार विमान वाहतूक परिसंस्था तयार करण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. एअर इंडियाने तिच्या ताफ्याचा विस्तार केल्यामुळे विमान देखभालीसाठी अभियंत्यांची उपलब्धता मजबूत करून, परिवर्तनाच्या प्रवासात पुढे जाताना एअरलाइनच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करेल आणि तिला स्वावलंबी बनवेल.

एएमई प्रोग्रामसाठी बिल्ड-टू-सूट सुविधा विकसित करण्यासाठी, एअर इंडियाने बंगलोर इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (बीआयएएल) ची उपकंपनी असलेल्या बेंगलुरु एअरपोर्ट सिटी लिमिटेड (BACL) सोबत करार केला आहे ज्यामध्ये आधुनिक क्लासरूम, सुसज्ज प्रयोगशाळांसोबतच व्यावहारिक प्रशिक्षण आणि पात्र प्रशिक्षकांची टीम असेल. बेंगळुरू एअरपोर्ट सिटी येथे 86,000 स्क्वेअर फुटांमध्ये पसरलेला कॅम्पस 2026 च्या मध्यापर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.

एअर इंडियाच्या नवीन 12-बे मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरहॉल (MRO) सुविधेजवळ हे बीएमटीओ असेल जे 2026 च्या सुरुवातीला कार्यान्वित होईल. येथे घेतल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमात दोन वर्षांचा क्लासरूम अभ्यास असेल आणि एमआरओ येथे दोन वर्षांचे ऑन जॉब प्रशिक्षण, याचा समावेश असेल.

BMTO चे उद्दिष्ट विमान देखभाल आणि अभियांत्रिकी ऑपरेशन्ससाठी कुशल व्यावसायिक तयार करणे हे आहे जिथे विद्यार्थ्यांना उद्योग मानकांचे आणि एअर इंडियाच्या विशिष्ट आवश्यकतांचे पालन करून अनुभव आणि प्रशिक्षण मिळेल.

नवीन BMTO सुविधा सुरू होईपर्यंत, AME शिक्षण आणि कार्यबल विकासासाठी तसेच विमान देखभाल अभियंत्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या वचनबद्धतेमध्ये सातत्य राखण्यासाठी बेंगळुरू आणि हैदराबादमधील इतर प्रतिष्ठित संस्थांसोबत एअर इंडिया कॅडेट AME कार्यक्रम राबवेल.

“एअर इंडियाच्या मानकांनुसार बेसिक मेंटेनन्स ट्रेनिंग ऑर्गनायझेशन हे सुरुवातीपासून प्रशिक्षित कुशल अभियंत्यांची व्यवस्था करेल. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळच ही सुविधा उपलब्ध होणार असल्याने आमच्या AME कॅडेट्सना त्यांच्या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून प्रत्यक्ष अनुभव मिळेल. तसेच एअर इंडियाच्या सध्या सुरू असलेल्या फ्लीट विस्ताराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते या उमेदवारांना सक्षम करेल, त्यांच्या भविष्याला आधार देईल.” असे एअर इंडियाच्या एव्हिएशन अकादमीचे संचालक सुनील भास्करन म्हणाले.

एअर इंडियाच्या वाढत्या फ्लीट मेंटेनन्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि AME पदवीधरांसाठी करिअरची विशेष संधी देण्यासाठी हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. विद्यापीठासोबतच्या भागीदारीद्वारे विद्यार्थ्यांना एकाच वेळी पदवी घेण्यास प्रोत्साहित केले जाईल, ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक आणि करिअरच्या संधी वाढतील.

“अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा स्थापन करण्याची एअर इंडियाची वचनबद्धता भारताच्या विमानवाहतूक क्षमता वाढवण्याच्या दिशेने एक धाडसी पाऊल आहे. बेंगळुरुतील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास करण्यासाठी आणि तो टिकवून ठेवण्यासाठी शिक्षण आणि कौशल्य विकास महत्त्वाचा आहे. एअर इंडिया BMTO नवोन्मेष आणि सहकार्याला चालना देणारी भरभराट करणारी परिसंस्था विकसित करण्याच्या आमच्या दृष्टीकोनाला बळ देते,” राव मुनुकुतला, कार्यकारी संचालक आणि सीईओ, BACL म्हणाले.

एअर इंडियाने पाच वर्षांच्या परिवर्तनाच्या प्रवासाला सुरुवात केली आहे, Vihaan.AI, ज्यामध्ये 500 हून अधिक नवीन विमाने आहेत. ज्याची डिलिव्हरी वेगाने सुरू आहे आणि लेगसी विमानांसाठी USD 400 दशलक्ष इंटीरियर रेट्रोफिट कार्यक्रम सुरू केला आहे. यासोबतच एअर इंडियाने ग्रुप एअरलाइन्समध्ये लाइन मेंटेनन्स ऑपरेशन्सची इन-हाउसिंग सुरू केली आहे ज्यामुळे ती स्वावलंबी होईल. सप्टेंबर 2024 मध्ये, एअर इंडिया ग्रुपने बेंगळुरूमध्ये एका मेगा MRO सुविधेचे बांधकाम सुरू करण्याची घोषणा करत भारतासाठी एक मजबूत स्वावलंबी विमान परिसंस्था निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments