Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी संविधान रॅलीचे आयोजन*

संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी संविधान रॅलीचे आयोजन*

*
पुणे, दि. २५: सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, पुणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वा. संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समाजकल्याण विभागाने दिली आहे.

भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करून कॅम्प येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे संविधान रॅलीची सुरुवात करण्यात येणार आहे. या रॅलीचा मार्ग नवीन जिल्हा परिषद – ब्ल्यू नाईल हॉटेल चौक – पोलीस आयुक्त कार्यालय चौक – समाजकल्याण आयुक्तालय – एसबीआय बँक चौक – बंडगार्डन पोलीस ठाणे चौक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, ससून रुग्णालयासमोर असा राहणार असून या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे.

संविधान रॅलीत समाज कल्याण विभाग व बार्टी संस्थेच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांतील प्रवेशित विद्यार्थी, महाविद्यालयांतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक संघटनांचे सदस्य, तृतीयपंथी व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, तृतीयपंथी व्यक्ती तसेच सर्व सामाजिक क्षेत्रातील संघटना सहभागी होणार आहेत, अशी माहितीही समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments