ऑक्टोबर २०२४ मध्ये २०,८९४ मालमत्तांची नोंदणी करण्यात आली, ज्यामध्ये वार्षिक ३९ टक्के वाढ झाली
· ऑक्टोबर २०२४ मध्ये मालमत्ता नोंदणींच्या माध्यमातून ७५१ कोटी रूपये मुद्रांक शुल्क गोळा करण्यात आले, ज्यामध्ये वार्षिक ५२ टक्के वाढ झाली
· वायटीडी जानेवारी ते ऑक्टोबर, पुण्यामध्ये १,५९,३०६ हून अधिक मालमत्ता नोंदणी झाल्याचे निदर्शनास आले आहे, ज्यामध्ये वार्षिक ३० टक्के वाढ झाली.
पुणे, नोव्हेंबर २८, २०२४: नाइट फ्रँक इंडियाने आपल्या नवीन अहवालामध्ये नमूद केले की, ऑक्टोबर २०२४ साठी पुण्यातील मालमत्ता नोंदणींमध्ये प्रबळ वाढ झाली आहे. शहराने २०,८९४ हून अधिक मालमत्ता नोंदणींची नोंद केली, ज्यामधून गेलया वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ३९ टक्के वाढ दिसून येते. मुद्रांक शुल्क संकलनामध्ये देखील मोठी वाढ झाली, जेथे मुद्रांक शुल्क संकलनाने वार्षिक ५२ टक्क्यांच्या वाढीसह ७५१ कोटी रूपयांचा टप्पा पार केला.
नवरात्री व दिवाळीसह सुरू होणारा सणासुदीचा काळ पारंपारिकरित्या मालमत्ता खरेदीसाठी शुभ मानला जातो. या सणासुदीच्या काळाने नोंदणींमधील या वाढीला गती देण्यामध्ये प्रमुख भूमिका बजावली. तसेच, वार्षिक वाढीचे श्रेय बेस इफेक्टला दिले जाऊ शकते: २०२३ ऑक्टोबरच्या पहिल्या १४ दिवसांवर श्राद्ध कालावधीचा प्रभाव दिसून आला, जेथे ग्राहक मोठ्या गुंतवणूका करण्यापासून दूर राहिले. यंदा, श्राद्ध कालावधी २ ऑक्टोबर रोजी समाप्त झाला, ज्यामुळे महिन्याच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये त्याचा प्रभाव कमी झाला.
मालमत्ता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क संकलन
Period
Registrations (Units)
Stamp duty collection (INR cr)
Oct-23
14,983
495
Oct-24
20,894
751
YoY Change
39%
52%
मालमत्ता नोंदणी, मालमत्तेचे मूल्य आणि मुद्रांक शुल्क संकलन
Period
(Jan-Oct)
Total registration
Stamp duty collection (INR cr)
Jan to Oct 2022
112,008
3,827
Jan to Oct 2023
122,610
4,306
Jan to Oct 2024
159,306
6,004
2024 YoY
30%
39%
मालमत्ता नोंदणी, मालमत्तेचे मूल्य आणि मुद्रांक शुल्क संकलन
Year
Month
Total Registration
Stamp Duty Collection
(INR Cr)
2023
October
14,983
495
2023
November
14,988
485
2023
December
14,725
560
2024
January
17,786
589
2024
February
18,791
662
2024
March
22,189
822
2024
April
14,244
566
2024
May
12,280
547
2024
June
14,690
545
2024
July
13,731
521
2024
August
13,397
592
2024
September
11,056
508
2024
October
20,894
751
स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च, महाराष्ट्र सरकार – नोंदणी व मुद्रांक विभाग (आयजीआर)
२०२४ च्या पहिल्या दहा महिन्यांमध्ये पुण्याच्या निवासी क्षेत्रातील मालमत्ता विक्री नोंदणीमध्ये प्रबळ वाढ दिसण्यात आली, जेथे १.५ लाख युनिट्सची नोंदणी झाली आणि गेल्या दोन वर्षांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. शहराने २०२३ मधील याच कालावधीच्या तुलनेत ३० टक्क्यांच्या वाढीसह १५९,३०६ मालमत्ता नोंदणींची नोंद केली. मुद्रांक शुल्क संकलनाने मोठ्या वाढीची नोंद करत ६,००४ कोटी रूपयांचा टप्पा पार केला, ज्यामध्ये वार्षिक ३९ टक्क्यांची वाढ झाली.
पुण्यामध्ये सुरू असलेले पायाभूत सुविधा विकास, इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत किफायतशीरपणा आणि मालकीहक्काचे घर असण्याप्रती प्रबळ ओढ यामुळे ही प्रभावी कामगिरी झाली. या सर्व घटकांनी संपूर्ण २०२४ मध्ये प्रबळ मागणीला गती दिली.
ऑक्टोबर २०२४ मध्ये १ कोटी रूपये व त्यापेक्षा उच्च मूल्य असलेल्या सदनिकांच्या मागणीत वाढ दिसण्यात आली
पुण्यातील गृहनिर्माण बाजारपेठेत १ कोटी रूपये व त्यापेक्षा उच्च मूल्य असलेल्या मालमत्तांसाठी मागणी वाढली. लक्झरी विभागाने ऑक्टोबर २०२३ मधील ११ टक्क्यांवरून ऑक्टोबर २०२४ मध्ये १४ टक्क्यांपर्यंत वाढ केली. दरम्यान, ५० लाख रूपये ते १ कोटी रूपयांपर्यंतच्या सदनिका गृहखरेदीदारांमध्ये सर्वात लोकप्रिय राहिल्या.
निवासी मालमत्ता व्यवहारांसाठी तिकिट आकाराचे प्रमाण
Ticket size
Share in Oct 2023
Share in Oct 2024
Under INR 25 lakhs
21%
21%
INR 25 – 50 lakhs
35%
31%
INR 50 lakhs – 1 Cr
32%
32%
INR 1 Cr – 2.5 Cr
11%
14%
INR 2.5 Cr – 5 Cr
1%
2%
Over 5 Cr
<=1% <=1% स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च, महाराष्ट्र सरकार - नोंदणी व मुद्रांक विभाग (आयजीआर) नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजाल म्हणाले, ''पुण्यातील निवासी बाजारपेठेने २०२४ च्या पहिल्या दहा महिन्यांमध्ये अपवादात्मक गती दाखवली, जेथे मालमत्ता नोंदणींनी १.५ लाख युनिट्सचा टप्पा पार केला, गेल्या दोन वर्षांमध्ये झपाट्याने ही वाढ झाली आहे. तसेच मुद्रांक शुल्क संकलनांमध्ये वार्षिक ३९ टक्क्यांची वाढ झाली. ऑक्टोबरमध्ये ही गती अधिक प्रबळ झाली, ज्याचे श्रेय सणासुदीच्या काळातील मागणी, स्थिर व्याजदर, प्रीमियम घरांसाठी वाढती पसंती आणि आशावादी ग्राहक भावना या घटकांना जाते. नोंदणींमधील वार्षिक ३० टक्के वाढीमधून बाजारपेठेतील स्थिरता दिसून येते, ज्याला वाढते उत्पन्न, सुलभ वित्तपुरवठा आणि सुरू असलेल्या पायाभूत सुविधा सुधारणांचे पाठबळ मिळाले. यामुळे पुणे गृहखरेदीदारांसाठी आघाडीचे गंतव्य बनले आहे.'' मोठ्या सदनिकांसाठी उच्च मागणी कायम ८०० चौरस फूटांहून अधिक जागा असलेल्या सदनिकांचे प्रमाण ऑक्टोबर २०२३ मधील २८ टक्क्यांवरून ऑक्टोबर २०२४ मध्ये ३२ टक्क्यांपर्यंत वाढले, ज्यामधून महामारीनंतर देखील मोठ्या सदनिकांसाठी सतत मागणी होत असल्याचे दिसून येते. निवासी मालमत्ता व्यवहारांसाठी क्षेत्राचे प्रमाण Area in sq ft Share in Oct 2023 Share in Oct 2024 Under 500 25% 22% 500-800 47% 46% 800-1000 14% 15% 1000- 2000 12% 14% Over 2000 2% 3% स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च, महाराष्ट्र सरकार - नोंदणी व मुद्रांक विभाग (आयजीआर) ऑक्टोबर २०२४ मध्ये सेंट्रल पुण्यामध्ये एकूण निवासी व्यवहारांपैकी ८० टक्के व्यवहारांची नोंद ऑक्टोबर २०२४ मध्ये हवेली तालुका, पुणे महानगरपालिका (पीएमसी) आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) यांचा समावेश असलेले सेंट्रल पुणे निवासी व्यवहारांसाठी प्रमुख हब राहिले, ज्याचे बाजारपेठेत ८० टक्क्यांचे मोठे योगदान होते. असे असताना देखील हे प्रमाण गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत काहीसे कमी झाले आहे, तसेच शहरातील इतर भागांमधील नवीन पुरवठा पुण्यातील गृहखरेदीदारांच्या सतत बदलत असलेल्या गरजांची पूर्तता करत आहे. मावळ, मुळशी व वेल्हे यांसारख्या भागांचा समावेश असलेल्या पश्चिम पुणेने निवासी व्यवहारांमध्ये दुसरे सर्वात मोठे प्रमाण सुनिश्चित केले, जे १२ टक्क्यांसह दुसरे सर्वात मोठे प्रमाण होते. तसेच याच कालावधीदरम्यान उत्तर, दक्षिण व पूर्व पुणेचे एकत्रित निवासी व्यवहारांमध्ये प्रमाण ७ टक्के होते. निवासी मालमत्ता व्यवहारांसाठी सूक्ष्म बाजारपेठांचे प्रमाण Micro market Share in October 2023 Share in October 2024 North 5% 5% South 3% 1% East 1% 1% West 9% 12% Central 82% 80% स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च, महाराष्ट्र सरकार - नोंदणी व मुद्रांक विभाग (आयजीआर)


