पुणे, ४ डिसेंबर २०२४ : ह्युंडाई मोटर ग्रुपने बॅटरी आणि इलेक्ट्रिफिकेशनच्या क्षेत्रात सहयोगी संशोधन प्रणाली स्थापन करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) सोबत भागीदारीची घोषणा केली आहे.यामध्ये आयआयटी दिल्ली,आयआयटी बॉम्बे आणि आयआयटी मद्रास या तीन संस्थांचा समावेश आहे.याअंतर्गत आयआयटी दिल्ली येथे ह्युंडाई सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओइ)स्थापित होणार असून ह्युंदाई मोटर ग्रुपच्या प्रायोजकत्वच्या पाठबळाने कार्यरत राहील. ह्युंडाई सीओइचे प्राथमिक उद्दिष्ट विशेषत: भारतीय बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बॅटरी आणि इलेक्ट्रिफिकेशन क्षेत्रातील विकासाला पुढाकार देणे आहे.
आयआयटी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात ‘ह्युंडाई मोटर ग्रुप-आयआयटी ह्युंडाई सीओइच्या संयुक्त स्थापनेसाठी करारावर स्वाक्षरी केली. याप्रसंगी आयआयटी दिल्लीचे संचालक प्रोफेसर रंगन बॅनर्जी, आयआयटी बॉम्बेचे अधिष्ठाता सचिन सी. पटवर्धन आणि आयआयटी मद्रासचे अधिष्ठाता मनू संथानम आणि ह्युंडाई मोटर ग्रुपचे अधिकारी उपस्थित होते.


