Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedमाझी शाळा, माझा फळा’* जिवंत देखाव्यातून शाळेच्या आठवणींना उजाळा

माझी शाळा, माझा फळा’* जिवंत देखाव्यातून शाळेच्या आठवणींना उजाळा

 

 

पुणे : गोखलेनगर–जनवाडी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाही जिवंत देखाव्याची परंपरा कायम ठेवत ‘माझी शाळा, माझा फळा’ हा आगळावेगळा देखावा सादर केला आहे. या देखाव्याच्या माध्यमातून जुन्या शाळेच्या आठवणी, पारंपरिक खेळ तसेच सध्याच्या शिक्षण व्यवस्थेतील विविध प्रश्नांवर भाष्य करण्यात आले आहे.

 

‘गोड गोड शाळेच्या आठवणी छान, आठवणीच्या शाळेत चाल’ या गाण्यावर विद्यार्थ्यांनी कबड्डी, खो-खो, आंधळी कोशिंबीर, लंगडी, चिरगुटी तसेच दोरीवरच्या उड्या अशा पारंपरिक खेळांवर आधारित आकर्षक नृत्य सादर केले. या सादरीकरणातून बालपणीच्या शाळेतील रम्य आठवणींना उजाळा देण्यात आला.

 

तसेच ‘माझी म्हणू का’ या गाण्यावर विद्यार्थ्यांनी सध्याच्या शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर भाष्य करणारे सादरीकरण केले. पेपरफुटी, परीक्षा रद्द होणे, रस्ता रोको आंदोलन तसेच बदलती शिक्षणपद्धती यांसारख्या विषयांचे प्रभावी चित्रण या देखाव्यात करण्यात आले आहे.

 

जिवंत अभिनय, नृत्य आणि सामाजिक विषयांची सांगड घालत सादर करण्यात आलेल्या या देखाव्याला परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गणेशोत्सव मंडळाचा हा उपक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

 

देखाव्यात निलम वैरागर,मनोज नगरकर, सुमित घोलप यांच्यासह किलबिल शाळा व जागृती संस्थेच्या पंधरा विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे.

 

अशोक खुडे मंडळाचे अध्यक्ष असून उमेश वाघ, विनोद सकट, विवेक कांबळे अभिजीत धाडवे, नरेश कांबळे योगेश शिनगारे, सचिन सकटे, प्रशांत शिंदे, केतन गायकवाड, विलास खराडे, गौरव शिंदे प्रमुख पदाधिकारी आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments