Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांच्या लाभाकरीता केलेल्या अर्जाच्या...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांच्या लाभाकरीता केलेल्या अर्जाच्या मूळप्रती सादर करण्याचे आवाहन

पुणे, दि. 4: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेण्याकरीता http://beta.slasdc.org या संकेतस्थळावर 31 मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या अर्जदारांनी अर्जाची मुळप्रत व त्याअनुषंगिक कागदत्राच्या दोन प्रती 15 डिसेंबरपर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक शिवाजी मांजरे यांनी केले आहे.

महामंडळामार्फत मुदत कर्ज योजना, महिला समृद्धी योजना, लघुॠण वित्त योजना आणि शैक्षणिक योजना राबविण्यात येत असून या योजनेचा लाभ घेण्याकरीता ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2024 अशी होती, तथापी अद्यापही काही अर्जदारांनी अर्जाच्या मुळप्रती व त्याअनुषंगिक कागदपत्रे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सर्वे नंबर 103, 104 मेंटल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे या कार्यालयास सादर केल्या नाहीत, तरी दिलेल्या विहित मुदतीत अर्जाची मुळप्रत व त्याअनुषंगिक कागदपत्रे सादर न करणाऱ्या अर्जदारांचे कर्ज प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाही, अशी माहिती श्री. मांजरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

****

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments