Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedएएम/एनएस इंडियाला मिळाली दोन महत्त्वाची बीआयएस प्रमाणपत्रे, विशेष स्टील क्षेत्रातील बाजारपेठेतील नेतृत्व...

एएम/एनएस इंडियाला मिळाली दोन महत्त्वाची बीआयएस प्रमाणपत्रे, विशेष स्टील क्षेत्रातील बाजारपेठेतील नेतृत्व अधिक मजबूत; आयात प्रतिस्थापनाला चालना

क्वेन्च्ड अँड टेम्पर्ड प्लेट्स (आयएस 2062: भाग 2) आणि प्रगत झिंक ॲल्युमिनियम-मॅग्नेशियम गंजरोधक कोटिंग्ज (आयएस 19210) साठी परवाना मिळवणारी भारतातील पहिली पोलाद उत्पादक कंपनी ठरली.

आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टांना अनुसरून धोरणात्मक पायाभूत सुविधा, संरक्षण आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये उच्च-मूल्याच्या देशांतर्गत खरेदीच्या संधी उपलब्ध होणार.

हजीरा – सुरत, 18 सप्टेंबर 2026: आर्सेलरमित्तल निप्पॉन स्टील इंडिया (एएम/एनएस इंडिया) ने दोन महत्त्वपूर्ण नवीन मानकांनुसार भारतीय मानक ब्युरोचे (बीआयएस) परवाने मिळवत प्रगत पोलाद निर्मिती क्षेत्रातील आपले नेतृत्व अधिक मजबूत केले आहे. या यशामुळे कंपनीची नवकल्पना, गुणवत्ता तसेच भारत सरकारच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित झाली आहे. तसेच पायाभूत सुविधा आणि अवजड अभियांत्रिकी क्षेत्रांसाठी नव्या संधींचे मार्गही खुले झाले आहेत.

 

एएम/एनएस इंडिया ही आयएस 2062 (भाग 2):2026 या नव्याने लागू करण्यात आलेल्या मानकासाठी अखिल भारतीय स्तरावरील पहिले बीआयएस परवाना मिळवणारी भारतातील पहिली पोलाद उत्पादक कंपनी ठरली आहे. या मानकांत हॉट रोल्ड क्वेन्च्ड अँड टेम्पर्ड (क्यू ॲंड टी) पोलादाच्या प्लेट्स, शीट्स, स्ट्रिप्स आणि वाइड फ्लॅट्सचा समावेश आहे.यासोबतच कंपनीने आयएस 19210:2025 अंतर्गत प्री-पेंटेड झिंक-ॲल्युमिनियम-मॅग्नेशियम मिश्रधातूचे कोटिंग असलेल्या पोलादाच्या स्ट्रिप आणि शीटसाठीही बीआयएस परवाना मिळवला आहे. यामुळे जागतिक स्तरावरील प्रगत पोलाद उत्पादने भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करून देण्याच्या दिशेने कंपनीने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

 

बीआयएस परवान्यांचे व्यावसायिक आणि कार्यकारी महत्त्व :

 

सार्वजनिक खरेदीसाठी नियामक अनुपालन : राज्य सरकारच्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा, संरक्षण आणि सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्पांना पोलाद पुरवण्यासाठी बीआयएस प्रमाणपत्र अनिवार्य आहे. या परवान्यांमुळे एएम/एनएस इंडिया ने अनिवार्य खरेदी निकष पूर्ण केले असून, प्रमाणित दर्जाच्या पोलादाची आवश्यकता असलेल्या सरकारी प्रकल्पांना कंपनी आता पुरवठा करू शकते.

देशांतर्गत उपलब्धता आणि आयात प्रतिस्थापन : आयएस 2062 (भाग 2):2026 साठी देशातील पहिली परवानाधारक कंपनी म्हणून एएम/एनएस इंडिया क्यू ॲंड टी पोलाद प्लेट्सचा देशांतर्गत पुरवठा उपलब्ध करून देत आहे. यामुळे यापूर्वी आयात केलेल्या पोलादावर अवलंबून असलेल्या बाजारपेठेतील गरज पूर्ण करण्यास मदत होणार आहे.

उत्पादन श्रेणीचा विस्तार : या बीआयएस परवान्यांमुळे कंपनीच्या हजीरा आणि पुणे येथील प्रकल्पांमध्ये उत्पादित विशेष पोलाद उत्पादनांचे व्यावसायिक वितरण शक्य होणार आहे. यामध्ये मोठा भार सहन करणाऱ्या संरचनात्मक वापरासाठीचे पोलाद तसेच गंजरोधक कोटिंग असलेल्या उत्पादनांचा समावेश आहे.

एएम/एनएस इंडियाच्या हजीरा आणि पुणे येथील अत्याधुनिक प्रकल्पांमध्ये उत्पादित करण्यात आलेली ही प्रमाणित उत्पादने वेगाने बदलणाऱ्या औद्योगिक गरजांनुसार विशेष उपाय विकसित करण्याची कंपनीची तांत्रिक क्षमता अधोरेखित करतात. या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे कंपनीच्या गौरवशाली कामगिरीत आणखी एका मानाचा तुरा खोवला गेला आहे. एएम/एनएस इंडियाच्या पोलादाचा वापर यापूर्वीच देशातील महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रकल्पांमध्ये झाला आहे. यामध्ये चेनाब

 

रेल्वे पूल तसेच आयएनएस सुरत, आयएनएस विशाखापट्टणम आणि नुकतेच सेवेत दाखल झालेले आयएनएस मालवण यांसारख्या महत्त्वपूर्ण नौदल प्लॅटफॉर्मचा समावेश आहे.

 

नव्याने लागू करण्यात आलेले आयएस 2062 (भाग 2):2026 हे क्वेन्च्ड अँड टेम्पर्ड (क्यू ॲंड टी) पोलादाच्या प्लेट्ससाठी विशेषतः विकसित करण्यात आलेले पहिले बीआयएस मानक आहे. विशेष उष्णता उपचार प्रक्रियेद्वारे तयार केलेल्या क्यू ॲंड टी पोलादामध्ये अत्यंत उच्च मजबुती आणि टिकाऊपणा असतो. त्यामुळे अधिक वजनाचा भार पेलण्यास सक्षम, तुलनेने हलक्या वजनाच्या आणि अधिक मजबूत संरचना उभारणे शक्य होते.या उत्पादनांचा वापर पूल, अवजड अभियांत्रिकी उपकरणे, खाणकामातील यंत्रसामग्री, ऑफशोअर संरचना, सागरी क्षेत्रातील उपयोग तसेच सुरक्षितता आणि कार्यक्षमतेला अत्यंत महत्त्व असलेल्या इतर आव्हानात्मक औद्योगिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो.

 

आयएस 19210:2025 हे मानक प्री-पेंटेड झिंक-ॲल्युमिनियम-मॅग्नेशियम कोटिंग असलेल्या पोलाद उत्पादनांसाठी गुणवत्ता निकष निश्चित करते. या श्रेणीतील एएम/एनएस इंडियाची उत्पादने ऑप्टिगल® तंत्रज्ञानावर आधारित आहेत. हे आर्सेलरमित्तलचे जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त झिंक-ॲल्युमिनियम-मॅग्नेशियम कोटिंग तंत्रज्ञान आहे. पारंपरिक कलर-कोटेड पोलाद उत्पादनांच्या तुलनेत या प्रगत कोटिंगमुळे गंजरोधक क्षमता लक्षणीयरीत्या वाढते, कापलेल्या कडांचे अधिक चांगले संरक्षण मिळते, उत्पादनाचे आयुष्य वाढते आणि देखभालीची गरज कमी होते. या उत्पादनांचा वापर रूफिंग आणि क्लॅडिंग, प्री-इंजिनिअर्ड इमारती, पायाभूत सुविधा, गोदामे, रेल्वे आणि औद्योगिक बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो.

 

एएम/एनएस इंडियाकडे सध्या 25 बीआयएस परवाने आहेत. यामध्ये आयएस 3039, आयएस 18809:2024 आणि आयएस 2062 (भाग 2):2026 या तीन मानकांसाठी मिळालेल्या प्रतिष्ठेच्या अखिल भारतीय स्तरावरील पहिल्या बीआयएस परवान्यांचा समावेश आहे. प्रगत पोलाद तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाची उत्पादने भारतीय बाजारपेठेत आणण्यात कंपनीचे सातत्यपूर्ण नेतृत्व यावरून अधोरेखित होते.

 

या नवीन मान्यतांमुळे जागतिक दर्जाच्या निकषांनुसार पोलाद उत्पादने आणि उपाय उपलब्ध करून देणारी कंपनी म्हणून एएम/एनएस इंडियाची प्रतिष्ठा अधिक मजबूत झाली आहे. भारताच्या दीर्घकालीन पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्राच्या विकासाला बळ देण्यात सक्षम असलेली आघाडीची कंपनी म्हणून तिचे स्थान यामुळे

आणखी दृढ झाले आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments