Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून* *माजी राज्यपाल एस.एम. कृष्णा यांना श्रद्धांजली*

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून* *माजी राज्यपाल एस.एम. कृष्णा यांना श्रद्धांजली*

मुंबई, दि. १० :- महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस.एम. कृष्णा यांच्या निधनाने राजकारण, समाजकारण, शैक्षणिक, न्यायिक क्षेत्रातील दिग्गज, मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस.एम. कृष्णा यांना दांडगा राजकीय, प्रशासकीय, शैक्षणिक अनुभव आहे. त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अशी महत्त्वाची सार्वजनिक पदे भूषविली आहेत. या पदांवरून काम करताना त्यांनी नेहमीच लोकहित जपण्याचा प्रयत्न केला आहे. पायाभूत सुविधांचा विकास, शैक्षणिक गुणवत्तेत वाढ, आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सुधारणा आदी बाबतीतील त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील. श्री. एस.एम. कृष्णा यांचे निधन हे त्यांच्या परिवारासाठी मोठा धक्का आहे. हे दुःख पचवण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना मिळो, अशी प्रार्थना करतो. एस.एम. कृष्णा यांच्या कुटुंबियांच्या, नातेवाईकांच्या, कार्यकर्त्यांच्या, चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
*******

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments