पुणे, १२ डिसेंबर २०२४ – आधार हाऊसिंग फायनान्स लि. प्रधानमंत्री आवास योजना – अर्बन २.० (पीएमएवाय-यू २.०) अंतर्गत पुणेमधील गृहखरेदी अधिक परवडणारे करण्याप्रती समर्पित आहे. सरकारी उपक्रमाबाबत जागरूकता वाढवण्याच्या आणि गृहकर्ज विनासायासपणे उपलब्ध करून देण्याच्या मनसुब्यासह हाऊसिंग फायनान्स कंपनीने १२ ते १५ डिसेंबर २०२४ पर्यंत त्यांच्या शाखा कार्यालयामध्ये स्पॉट सँक्शन कॅम्पचे आयोजन केले आहे. पुण्यात राहणाऱ्या ग्राहकांना या स्पॉट सँक्शन कॅम्पचा फायदा होईल, तसेच बारामती, चिंचवड, सोलापूर अशा लहान शहरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या मोठ्या समूहाला देखील फायदा होईल.
आधार ६८ शाखांच्या आपल्या व्यापक नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रातील उपस्थिती प्रबळ करत आहे, ज्यामध्ये त्यांच्या डीप इम्पॅक्ट शाखांचा समावेश आहे, ज्यांचा प्रांतातील नागरिकांना सहजपणे कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. पीएमएवाय उपक्रम कंपनीला अल्प उत्पन्न गटासाठी (ईडब्ब्ल्यूएस, एलआयजी व एमआयजी) परवडणारे गृहकर्ज सोल्यूशन्स देण्यास आणि पहिले घर खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबांच्या जीवनाला उत्साहित करण्यास मदत करेल.


