Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे पुस्तक महोत्सवात आज दुसरा विश्वविक्रम होणार

पुणे पुस्तक महोत्सवात आज दुसरा विश्वविक्रम होणार

पुणे; १३ डिसेंबर : पुणे पुस्तक महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आज गुरुवारी 14 डिसेंबरला ‘ एकाच लेखकाच्या अधिकाधिक पुस्तकांचे प्रदर्शन’ यावर विश्वविक्रम होणार आहे. पुणे पुस्तक महोत्सवातील हा दुसरा विश्वविक्रम राहणार आहे. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी विश्वविक्रम होणार असल्याने, सर्वांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आज शनिवारपासून पुणे पुस्तक महोत्सवाला सुरुवात होत आहे. या महोत्सवात एकूण पाच विश्वविक्रम करण्यात येणार आहे. यातीलच दुसरा विश्वविक्रम आज शनिवारी १४ डिसेंबर रोजी करण्यात येईल. अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले. पुणे पुस्तक महोत्सवात प्रसिद्ध लेखक आणि परमपूज्य जैन आचार्य विजयरत्न सुरीश्र्वर महाराज यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या सहाय्याने गिनेज बुक वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात येणार आहे. ‘ एकाच लेखकाच्या अधिकाधिक पुस्तकांचे प्रदर्शन ‘ अशा विषयाला अनुसरून हा विश्वविक्रम होणार आहे. हा विश्वविक्रम दुपारी बारा वाजता करण्याला सुरुवात होईल. साधारण चार वाजताच्या सुमारास पूर्ण होईल. गिनेस बुक वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रशासनाने यंदा ही नवीन श्रेणी खास पुणे पुस्तक महोत्सवासाठी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक पुणेकरांनी उपस्थित राहून विश्वविक्रमाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन संयोजन समितीचे सदस्य मिलिंद वेर्लेकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments