Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रख्यात कवी डॉ. कुमार विश्वास यांनी घेतले 'दगडूशेठ' गणपतीचे दर्शन*  *श्रीमंत...

प्रख्यात कवी डॉ. कुमार विश्वास यांनी घेतले ‘दगडूशेठ’ गणपतीचे दर्शन*  *श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे डॉ.विश्वास यांचा सन्मान* 

 

 

पुणे : प्रख्यात कवी डॉ. कुमार विश्वास यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली. डॉ. कुमार विश्वास यांच्यासोबत ‘अपने अपने राम’ या त्यांच्या प्रसिद्ध कार्यक्रमातील कलाकार देखील उपस्थित होते.

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने यांनी डॉ. कुमार विश्वास यांचे स्वागत केले. यावेळी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. सन्मानचिन्ह देऊन डॉ. विश्वास यांचा गौरव करण्यात आला.

 

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण व रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामध्ये श्रीराम पंचायतन याग सुरु असून यामध्ये देखील डॉ. कुमार विश्वास व सहका-यांनी सहभाग घेतला. तसेच गणरायाची मनोभावे प्रार्थना केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments