Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे नेत्रतज्ञ संघटनेची १७ वी वार्षिक परिषद संपन्न महाराष्ट्र नेत्र तज्ञ...

पुणे नेत्रतज्ञ संघटनेची १७ वी वार्षिक परिषद संपन्न महाराष्ट्र नेत्र तज्ञ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजन ; आॅल इंडिया आॅप्थलोमोलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.समर बसक यांची उपस्थिती

पुणे : पुणे नेत्रतज्ञ संघटनेची १७ वी वार्षिक परिषद ‘स्पेक्ट्रम २०२४’ चे आयोजन महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने औंधमधील भारतीय विज्ञान व संशोधन संस्था येथे करण्यात आले होते. परिषदेच्या उद््घाटन सोहळ्यास आॅल इंडिया आॅप्थलोमोलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.समर बसक, ज्येष्ठ नेत्रचिकीत्सक पद्मश्री तात्याराव लहाने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पुणे नेत्रतज्ञ संघटनेच्या अध्यक्ष डॉ.राधिका परांजपे, डॉ. नितीन कोलते, डॉ. आश्विनी मिसाळ, डॉ. वृषाली वरद आदींनी या परिषदेचे आयोजन केले होते. परिषदेत ब्रिटन, ओमान सह कलकत्ता, बंगळुरु, ओडिसा, जोधपूर, नवी दिल्ली, केरळ तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्रातून पुण्यासह मुंबई, नागपूर येथील तज्ञ सहभागी झाले होते.

डॉ. समर बसक म्हणाले, नव्या पिढीच्या तरुण डाॅक्टरांची विचार करण्याची क्षमता वेगळी असते. त्यांच्या विचारांना वेगळा पैलू असतो. त्यामुळे वेगवेगळ्या पिढीच्या डाॅक्टरांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. हेच आयुष्याचे तत्त्वज्ञान आहे.

डॉ. राधिका परांजपे म्हणाल्या, या परिषदेत नेत्र विज्ञान क्षेत्रातील संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन उपाययोजना यांवर सखोल चर्चा झाली. परिषदेत भारतातील आणि परदेशातील आघाडीचे नेत्र तज्ञ, संशोधक आणि नेत्रचिकित्सा क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments