मुंबई, १८ डिसेंबर २०२४ – एनपीसीआय भिम सर्व्हिस लि. (एनबीएसएल) या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या पूर्ण मालकीया उपकंपनीने क्राय (चाइल्ड राइट्स अँड यू) संस्थेसह भागिदारीत ‘गिफ्ट हॅपीनेस’ कॅम्पेनची घोषणा केली आहे. या उपक्रमाद्वारे वंचित मुलांच्या इच्छा नव्या वर्षाच्या निमित्ताने पूर्ण करून त्यांना आनंद दिला जाणार आहे. १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान भिम अॅपवर होणाऱ्या प्रत्येक व्यवहारातून या उपक्रमासाठी योगदान मिळणार असून नवीन वर्ष मुलांसाठी खास ठरेल.
‘गिफ्ट हॅपीनेस’ कॅम्पेनमध्ये नव्या वर्षाशी संबंधित नवी सुरुवात आणि नवी आशा यांचा मेळ घालण्यात आला आहे. सुट्ट्यांच्या काळात समाजाचे ऋण फेडण्याची आणि भिम अॅपच्या उपयुक्ततेचा आनंद घेण्याची ही चांगली संधी आहे. हे कॅम्पेन युजर्सना त्यांच्या दिनक्रमात कोणताही बदल न करता केवळ दैनंदिन पेमेंट्ससाठी भिम अॅप वापरून त्यात सहभागी होण्यास प्रोत्साहन देणार आहे.
A child standing in front of a window with his arms outstretched
Description automatically generated
या उपक्रमाविषयी एनबीएसएलचे प्रमुख व्यवसाय अधिकारी राहुल हांडा म्हणाले, ‘नवीन वर्ष आशा आणि नवीन सुरुवात घेऊन येत असतं. ‘गिफ्ट हॅपीनेस’ कॅम्पेनच्या माध्यमातून आम्ही वंचित मुलांची स्वप्ने पूर्ण करून त्यांना आनंद देण्यासाठी लहानसे पाऊल उचलत आहोत. भिम अॅपद्वारे करण्यात आलेला प्रत्येक व्यवहार या इच्छा वास्तवात आणण्यासाठी योगदान देईल. या प्लॅटफॉर्मचा वापर वंचित मुलांमध्ये आनंद निर्माण करण्यासाठी व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वापरता येत असल्याचा आम्हाला अभिमान वाटत आहे.’
क्रायसह करण्यात आलेली भागिदारी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. या भागिदारीमुळे भिम अॅपद्वारे करण्यात आलेले योगदान गरजूंपर्यंत पोहोचून ठोस बदल घडवून आणेल आणि भिमची आर्थिक सर्वसमावेशकतेची बांधिलकी जपण्यास मदत होईल.
‘या अनोख्या उपक्रमासाठी भिमसह भागिदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. ‘गिफ्ट हॅपीनेस’ कॅम्पेनसाठी भिमसह करण्यात आलेली भागिदारी प्रत्येक मुलाप्रती जिव्हाळा आणि पाठिंबा व्यक्त करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे,’ असे क्रायचे (पश्चिम) प्रादेशिक संचालक क्रिएन राबदी म्हणाले.
या कॅम्पेनमुळे भिम युजर्सना नव्या वर्षाच्या निमित्ताने मुलांच्या आयुष्यात अर्थपूर्ण बदल घडवून आणण्याची संधी मिळेल. इन्ट्युटिव्ह इंटरफेजसाठी प्रसिद्ध असलेले भिम अॅप वापरून युजर्सना सफाईदारपणे पेमेंट्स करण्याचा अनुभव घेता येईल तसेच चांगल्या कामासाठी योगदान देता येईल. हा उपक्रम ग्राहकांना मूल्यवर्धित सेवा देण्याची आणि समाजासाठी काम करण्याची भिमची बांधिलकी दर्शवणारा आहे.
Link to Campaign Film: ‘Gift Happiness’


