भारत, डिसेंबर २०, २०२४ – डीबीएस बँक इंडियाने ‘डीबीएस स्टडी अब्रॉड टोटल असिस्ट’ लाँच केले आहे. ही अद्वितीय ऑफर डीबीएस ट्रेझर्स ग्राहकांना व त्यांच्या कुटुंबियांना परदेशात शिक्षण घेण्याच्या प्रवासादरम्यान मदतीचा हात पुढे करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या मते, २०२४ मध्ये भारतातील १.३ दशलक्षहून अधिक विद्यार्थ्यांनी परदेशात उच्च शिक्षण घेतले[ii], जेथे गेल्या सहा वर्षांमध्ये या आकडेवारीत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. हा वाढता ट्रेण्ड ओळखत बँकेने सर्वसमावेशक सोल्यूशन ‘डीबीएस स्टडी अब्रॉड टोटल असिस्ट’ लाँच केले आहे, जे विद्यार्थी व पालकांच्या बँकिंग गरजा आणि प्रमुख समस्यांचे निराकरण करते, तसेच आर्थिक व्यवस्थापनासाठी पाठिंबा आणि अनपेक्षित खर्चांपासून संरक्षण देते.
याची ठळक वैशिष्ट्ये[iii] पुढीलप्रमाणे:
· त्याच दिवशी[iv], विनाशुल्क आंतरराष्ट्रीय रेमिटन्सेस: पालक कोणतेही बँक शुल्क न भरता परदेशात पैसे हस्तांतरित करू शकतात, ज्यामुळे ते त्यांच्या मुलांच्या गरजांची पूर्तता करू शकतील, तसेच त्यांना लुप्त खर्चांबाबत कोणतीही चिंता करावी लागणार नाही.
· सर्वसमावेशक विद्यार्थी प्रवास विमा: विद्यार्थ्यांना आजार, सामान हरवणे व अपघात अशा अनपेक्षित घटनांसंदर्भात जवळपास १ दशलक्ष अमेरिकन डॉलर्ससह प्रबळ कव्हरेज मिळते.
· शैक्षणिक कर्ज: कुटुंबिय क्रेडिला फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडच्या (पूर्वीची एचडीएफसी क्रेडिला फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड) माध्यमातून प्रतिवर्ष[v] फक्त १०.२५ टक्यांपासून सुरू होणाऱ्या व्याजदरामध्ये शैक्षणिक कर्ज घेऊ शकतात, ज्यामुळे उच्च शिक्षणासाठी होणारा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल.
· परदेशातील खर्चावर शून्य फोरेक्स मार्कअप: डीबीएस ट्रेझर्स व्हिसा इन्फिनाइट डेबिट कार्ड जगभरात फोरेक्स मार्कअपशिवाय किफायतशीर व्यवहार सक्षम करते.
· रिमोट ओव्हरसीज बँक अकाऊंट ओपनिंग[vi]: सिंगापूरला प्रवास करणारे विद्यार्थी दुरूनच ओव्हरसीज बँक खाते उघडू शकतात, तसेच सुलभ प्रवासासाठी निर्गमनापूर्वी त्यांचे डेबिट कार्ड प्राप्त करू शकतात.
बँकेच्या क्रॉस-बॉर्डर व डिजिटल क्षमतांचा फायदा घेत ‘डीबीएस स्टडी अब्रॉड टोटल असिस्ट’ पूर्णत: डिजिटल व पेपरलेस अनुभवासह संपूर्ण प्रक्रिया सुव्यवस्थित करते, ज्यामुळे ग्राहक डिजिबँक अॅपच्या माध्यमातून सोईस्करपणे त्यांच्या आर्थिक गरजांचे व्यवस्थापन करू शकतात.
डीबीएस बँक इंडियाच्या कंझ्युमर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक व प्रमुख प्रशांत जोशी म्हणाले, ”आर्थिक व्यवस्थापनापासून नवीन संस्कृतींशी जुळून जाण्यापर्यंत परदेशातील शिक्षणामधील गुंतागूंतींमधून नेव्हिगेट करणे आव्हानात्मक ठरू शकते. ‘डीबीएस स्टडी अब्रॉड टोटल असिस्ट’चा हा प्रवास सोपा आणि अधिक सुखकर करण्याचा मनसुबा आहे. आम्हाला माहित आहे की, आमच्या ग्राहकांना योग्य पाठिंब्याची गरज आहे आणि आमचा त्यांना त्यांच्या मुलांसाठी आत्मविश्वासाने या संधींचा फायदा घेण्यास सक्षम करण्याचा उद्देश आहे. ३० वर्षांपासून आम्ही भारतातील ग्राहकांसाठी विश्वसनीय सहयोगी राहिलो आहोत, तसेच आम्ही सोल्यूशन्स डिझाइन करत राहू, जे त्यांना अधिक मुक्तपणे जगण्यास, अधिक कार्यक्षमपणे बँकिंग व्यवहार करण्यास आणि त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम करतील.”
आपल्या प्रिमिअम बँकिंग ऑफरिंग ‘ट्रेझर्स’च्या माध्यमातून बँक विशेष जीवनशैली विशेषाधिकार आणि सिग्नेचर फायद्यांची श्रेणी देते. नुकतेच, बँकेने संपूर्ण आशियामधील आपल्या प्रबळ उपस्थितीचा फायदा घेत भारतातील ग्राहकांसाठी सुधारित डीबीएस ट्रेझर्स तत्त्वाची घोषणा केली. विशेषत: एनआरआय व एचएनआयसाठी डिझाइन करण्यात आलेल्या या तत्त्वासह ग्राहक आता आशियामधील डीबीएसच्या सर्व सहा प्रमुख बाजारपेठांमध्ये प्रीमियम बँकिंगचा आनंद घेऊ शकतात, जेथे एका बाजारपेठेतील डीबीएस ट्रेझर्स ग्राहकांना सर्व डीबीएस बाजारपेठांमध्ये तेच विशेषाधिकार मिळतात. या ऑफरिंगमध्ये आंतरराष्ट्रीय फंड ट्रान्सफर्ससाठी प्राधान्य एफएक्स दर, माफ करण्यात आलेले सेवा शुल्क आणि शून्य एटीएम विद्ड्रॉवल शुल्क यांचा समावेश आहे. हे फायदे सहा प्रमुख डीबीएस बाजारपेठा: सिंगापूर, हाँगकाँग, तैवान, इंडोनेशिया, भारत आणि चीन येथील ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.
या ऑफरिंगबाबत अधिक माहितीसाठी ग्राहक कोणत्याही डीबीएस इंडिया शाखेला भेट देऊ शकतात किंवा वेबसाइट एक्स्प्लोअर करू शकतात: https://www.dbs.com/in/treasures/dbs-forms/banking/remittances/study-abroad-total-assist-form.page


