नवी दिल्ली, भारत आणि बेंटोनविले, आर्क., २० डिसेंबर २०२४– ख्रिसमस आणि सुट्टीचा सीझन येत असताना वॉलमार्ट भारतातील पुरवठादारांकडून उत्तम दर्जाची सणांची सजावट, रोजचे आणि पार्टीचे कपडे, दागदागिने आणि भेटवस्तूंचे अत्यंत आनंदाने स्वागत करत आहे. हे खास सिलेक्शन भारतीय कारागीरांचा गौरव करते आणि ते वॉलमार्ट यू.एस. स्टोअर्स, सॅम्स क्लब्स आणि वॉलमार्ट.कॉमवर उपलब्ध असेल.
या कलेक्शनमध्ये सणांसाठी घराची सजावट ते स्टायलिश थंडीचे कपडे, अप्रतिम दागिने, धमाल खेळणी आणि खेळाचे साहित्य आहे. भारतातून आणण्यात आलेली ही उत्पादने वॉलमार्टच्या सुट्टीच्या उत्पादनांमध्ये वैविध्यपूर्णता आणि दर्जा आणतात. त्यामुळे भेटवस्तू किंवा सुट्टीच्या वैयक्तिक खरेदीसाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो.
“या सणांच्या सीझनमध्ये वॉलमार्टमध्ये आम्हाला आमच्या अमेरिकन ग्राहकांसाठी त्यंत कुशल भारतीय पुरवठादारांकडून उत्तम दर्जाची सणाची उत्पादने आणताना अभिमान वाटतो,” असे मत वॉलमार्टच्या सोर्सिंग उपाध्यक्ष अँड्रिया अल्बराइट यांनी व्यक्त केले. “ही खास भारतात तयार केलेली उत्पादने अमेरिकेतील आमच्या सुट्टीच्या कलेक्शनला एक खास टच तर देतीलच पण त्याचबरोबर भारतीय व्यवसायांना पाठिंबा देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब ठरतील. त्याचबरोबर २०२७ पर्यंत भारताची निर्यात दर वर्षी १० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्टही पूर्ण होईल.”
प्रत्येक घरासाठी सणाचा उत्साह
या वर्षी वॉलमार्टच्या हॉलिडे टाइम्स कलेक्शनमध्ये ख्यातनाम पुरवठादारांकडून वैविध्यपूर्ण सजावटीचे साहित्य उपलब्ध करण्यात आले असून ते घरांना ऊबदार, सणांसाठी सज्ज आणि आनंदी बनवेलः
• एएल पेपरकडून सुती कापडाच्या कचऱ्यापासून बनवलेले कागदी ख्रिसमस ट्री तसेच हाताने बनवलेले दागिने,
• कनोडिया ग्लोबलकडून विणलेले ख्रिसमस स्टॉकिंग्स आता उपलब्ध आहेत.
या कलेक्शनमध्ये उत्तम दर्जाचे होम फर्निशिंग्सही उपलब्ध आहेत. त्यात सूर्या इंटरनॅशनलकडून कुशन आणि पिलोज, अवंती ओव्हरसीजची सुंदर खेळणी तसेच डिझाइनको, दिवाण अँड सन्स तसेच स्पेशलाइज्ड क्रिएशन्सचे लाकडी व धातूचे सजावटीचे साहित्य समाविष्ट आहे.
स्टायलिश, ऊबदार आणि पार्टीसाठी तयार राहा
वॉलमार्टच्या हॉलिडे फॅशन उत्पादनांमध्ये रोजच्या व पार्टीवेअर कपड्यांचे सुंदर कलेक्शन आहे. ते भेट देण्यासाठी किंवा वैयक्तिक हॉलिडे स्टाइलसाठी उत्तम आहे. त्यात खालील उत्पादनांचा समावेश आहेः
• पुरूषांसाठी वॉलमार्टच्या जॉर्ज या खासगी लेबलखाली लांब हाताचे थर्मल क्रू शर्ट्स, ओव्हरशर्ट्स आणि लहान हाताचे विणलेले शर्ट्स.
• शाही एक्स्पोर्ट्सने तयार केलेल्या फ्री असेम्ब्ली लेबलखाली महिलांसाठी विणलेले टॉप्स आणि ड्रेस.
• गोकलदास एक्स्पोर्ट्सकडून फ्री असेम्ब्ली ब्रँडअंतर्गत महिलांसाठी विणलेली जाकिटे.
• वॉलमार्टच्या टेरा अँड स्काय ब्रँडअंतर्गत प्लस साइज महिलांसाठी विणलेले स्कर्ट्स आणि ड्रेस आणि
• शाही एक्स्पोर्ट्स आणि गोकलदास एक्स्पोर्ट्सकडून टाइम अँड ट्रू ब्रँडअंतर्गत प्लेड शर्ट्स आणि ड्रेसेस.
सणाच्या आनंदात भर घालण्यासाठी वॉलमार्टच्या ब्रिलियन्स फाइन ज्वेलरी रेंजअंतर्गत एलिगंट आणि इंटरगोल्डकडून आलेले हिऱ्याचे इयररिंग्स, अंगठ्या आणि टेनिस ब्रेसलेट्स आहेत जे भेटवस्तू म्हणून देण्यासाठी किंवा सुट्टीचा लुक पूर्ण करण्यासाठी उपयुक्त आहेत.
कौटुंबिक क्षणांसाठी टीव्ही अॅक्सेसरीज
या सणांच्या कालावधीत वॉलमार्टच्या टीव्ही अॅक्सेसरीजसोबत कुटुंबासोबत चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या. वॉलमार्टच्या ऑन ब्रँडकडून टिल्टिंग, स्विवेलिंग आणि फुल मोशन वॉल माऊंट्स अशा सोयी अत्यंत विचारपूर्वक असून त्या चित्रपट आणि गेमिंगचा पुरेपूर आनंद घेता यावा म्हणून देण्यात आल्या आहेत.
सर्व वयोगटांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी खेळणी
वॉलमार्टच्या खेळण्यांच्या कलेक्शनमध्ये सर्व वयोगटांसाठी धमाल असेल:
• शेफ इन अ बास्केटसारखे कल्पनाशक्तीला चालना देणारे खेळ आणि एमप्लास्टिक्सकडून मेटेओर डार्ट्स (वॉलमार्टच्या किड्स कनेक्शन ब्रँडअंतर्गत)
• अॅक्टिव्ह खेळासाठी उत्तम असलेले प्राइम टाइमचे अॅडव्हेंचर फोर्स देस्पारेटो फोम डार्ट ब्लास्टर्स.
• हिरो इकोटेककडून किशोरवयीन मुलांसाठी तसेच प्रौढांसाठी कॉन्कॉर्ड क्रूझर बाइक्स, घराबाहेर खेळण्यासाठी उत्तम.
अॅक्टिव्ह सुट्टीसाठी सज्जता
फिटनेसप्रेमी तसेच घराबाहेरचे खेळ खेळण्याची आवड असलेल्यांसाठी वॉलमार्टने आपल्या अॅथलेटिक वर्क्स या खासगी ब्रँडअंतर्गत सॉकर बॉल्स आणि शिन गार्ड अशी मेड इन इंडिया खेळाची उत्पादने आणली आहेत. या उत्पादनांतून दर्जा आणि कामगिरी या दोन्ही गोष्टी एकत्र आणल्या असून संपूर्ण कुटुंबाला सुट्टीत अॅक्टिव्ह राहण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.
भारतातून उत्पादने आणून वॉलमारटने आपल्या अमेरिकन ग्राहकांना उत्तम दर्जाची उत्पादने तर दिली आहेतच पण त्याचबरोबर भारतीय उत्पादकांना जागतिक बाजारपेठेत उतरण्याची संधीही दिली आहे. वॉलमार्ट २०२७ पर्यंत प्रतिवर्ष १० अब्ज डॉलर्सची निर्यात करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने काम करत असून सोबत काम करण्यासाठी व संधी देण्यासाठी नवनवीन भारतीय पुरवठादार, उत्पादक आणि कारागीरांचा शोध घेत आहे. आतापर्यंत वॉलमार्टने भारतातील पुरवठादारांकडून ३० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक निर्यात केली आहे.
वॉलमार्टबाबत
वॉलमार्ट आयएनसी. (एनवायएसई: डब्ल्यूएमटी) ही लोकांचे नेतृत्व असलेली, तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी रिटेलर कंपनी असून ती लोकांना पैशांची बचत करतानाच कधीही, कुठेही म्हणजे स्टोअर्स, ऑनलाइन आणि त्यांच्या मोबाइलवर एक चांगले आयुष्य जगण्यासाठी मदत करते. दर आठवड्याला १९ देशांमध्ये १०,५०० पेक्षा अधिक स्टोअर्स आणि असंख्य इ-वाणिज्य वेबसाइट्सवर २५५ दशलक्ष ग्राहक आणि लोक भेट देतात. वॉलमार्टचा आर्थिक वर्ष २०२४ मधला महसूल ६४८ अब्ज डॉलर्स असून त्यांचे जगभरात सुमारे २.१ अब्ज सहयोगी आहेत. वॉलमार्ट शाश्वतता, कॉर्पोरेट परोपकार आणि रोजगाराच्या संधींमध्ये आघाडीवरील कंपनी आहे. वॉलमार्टबाबत अधिक माहिती येथे भेट देऊन मिळेल. फेसबुकवर facebook.com/walmart, X वर (पूर्वीचे ट्विटर) twitter.com/walmart, आणि लिंक्डइनवर linkedin.com/company/walmart येथे भेट द्या.


