Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedनव्या पिढीच्या भाषेत सांगा धर्म-संस्कृतीची माहिती लोकप्रिय लेखक अक्षत गुप्ता यांचे...

नव्या पिढीच्या भाषेत सांगा धर्म-संस्कृतीची माहिती लोकप्रिय लेखक अक्षत गुप्ता यांचे मत

पुणे, २१ डिसेंबर : ‘हिंदू धर्म, भारतीय संस्कृतीची माहिती नव्या पिढीला द्यायची असेल, तर त्यांना समजेल, उमजेल अशा भाषेत बोलणे-लिहिणे आवश्यक आहे. अगदी मराठीची मूळाक्षरे, हिंदीची वर्णमाला, इंग्रजी अल्फाबेट्स शिकवितानाही मुलांना संस्कृतीची ओळख करून देता येते,’ असे मत प्रसिद्ध लेखक अक्षत गुप्ता यांनी शनिवारी व्यक्त केले.

पुणे पुस्तक महोत्सवात आयोजित ‘पुणे लिट फेस्ट’मध्ये ‘द हिडन हिंदू’, ‘द नागा वॉरियर्स’सारख्या लोकप्रिय पुस्तकांचे लेखक अक्षत गुप्ता यांनी ‘पौराणिक कथाकथनाची कला’ या विषयावर पुणेकरांना मार्गदर्शन केले. अंजुम शर्मा यांनी त्यांच्याशी रोखठोक संवाद साधला.

‘माझ्या लहान मुलाला ‘मार्व्हल’, ‘डीसी’ या कॉमिक्सची पात्रे आवडायची, पण त्याचे आजी-आजोबा त्याला धर्म-संस्कृतीतील पौराणिक, ऐतिहासिक पात्रांविषयी गोष्टी सांगायचे, ते त्याला आवडत नव्हते. त्यामुळे त्याला धर्म, संस्कृती शिकवायची असेल, तर त्याच्या आवडीच्या भाषेत बोलावे लागेल, हे लक्षात आले. या विचारातून लेखन सुरू केले. मनात येईल, तसे लिहित गेलो. त्याला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, ‘द हिडन हिंदू’च्या तीन भागांनंतर आता ‘नागा वॉरियर्स’ हे पुस्तकही वाचकांच्या पसंतीस उतरत आहे,’ असे गुप्ता यांनी सांगितले.

‘पौराणिक विषयांवर आधारित काल्पनिक कथानक लिहिताना समकालीन पात्रांचा वापर करून नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न असतो. अहमदशहा अब्दालीने गोकुळावर आक्रमण केले असता, नागा साधूंनी बलिदान देऊन भगवान श्रीकृष्णाच्या या नगरीचे रक्षण केले होते. आजही देशात चार लाख नागा साधू असून, धर्म रक्षणाचे काम करतात. त्या कथेवर आधारित ऐतिहासिक काल्पनिक कथा लिहिली आहे,’ असेही त्यांनी सांगितले. ‘मै हिंदू हूँ’ या कवितेने त्यांनी संवाद कार्यक्रमाचा समारोप केला.
….

हिंदू धर्माच्या कथांना पौराणिक कथा संबोधून त्या मिथक असल्याचा प्रचार केला जातो. अन्य धर्माच्या कथांना पौराणिक संबोधले जात नाही. मात्र, आता काळ बदलत असून, पूर्वीचे खलनायक आता नायक झाले असून, खुलेपणाने बोलत-लिहित आहेत.
– अक्षत गुप्ता, लेखक
…..

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments