…..
पुणे पुस्तक महोत्सवात शनिवारी हजारो पुणेकरांनी भेट देऊन मोठ्या प्रमाणावर पुस्तकांची खरेदी केली आहे. या पुस्तक महोत्सवात २२ भारतीय भाषांमधील विविध विषयांवरील १२ लाख पुस्तके उपलब्ध आहेत. मुलांसाठी कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्य महोत्सव अशी मेजवानी आहे. पुणे पुस्तक महोत्सवात शनिवारी संविधानाचे भव्य शिल्प साकारून विश्वविक्रम करण्यात आला आहे. आज रविवारी २२ डिसेंबरला पुणे पुस्तक महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे पुणेकरांनी सहकुटुंब महोत्सवाला सकाळी १० ते रात्री १० या वेळेत भेट देऊन वाचन संस्कृतीला बळकट करण्यासाठी पुस्तक खरेदीचा आनंद घ्यावा. त्यासोबतच संविधानाच्या शिल्पाला भेट द्यावी, असे आवाहन पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी केले आहे.
पुणे पुस्तक महोत्सवाला भेट देण्याची आज शेवटची संधी
RELATED ARTICLES


