Wednesday, September 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedनादसप्तक संगीत विद्यालयाने रचला इतिहास * तब्बल 6 तास चाललेल्या कार्यक्रमात...

नादसप्तक संगीत विद्यालयाने रचला इतिहास * तब्बल 6 तास चाललेल्या कार्यक्रमात 101 गाण्यांचे सादरीकरण

पुणे,26 डिसेंबर 2024 : पुणेस्थित नादसप्तक संगीत विद्यालय तर्फे भारतीय शास्त्रीय संगीतामधील प्रसिध्द यमन (कल्याण) या अतिशय सुंदर,हृदयस्पर्शी रागावर मराठी,हिंदी,संस्कृत आणि सिंधी भाषेतील एकूण 101 गाणी सादर करत नवा इतिहास रचला. बालशिक्षण हायस्कूल,एमईएस ऑडिटोरियम,मयूर कॉलनी,कोथरूड येथे तब्बल 6 तास चाललेल्या यमनरंग या कार्यक्रमात नादसप्तक संगीत विद्यालयाचे संस्थापक-संचालक आणि प्रख्यात गायक व संगीतकार गिरीश पंचवाडकर यांनी आपल्या 40 विद्यार्थ्यांबरोबर या गाण्यांचे सादरीकरण केले.याप्रसंगी मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात संगीतकार आणि ज्येष्ठ गायक श्रीधर फडके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या मैफिलीचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रमी नोंद होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्या दृष्टीने या संस्थेचे पंच उपस्थित होते.

या कार्यक्रमात भावगीत,भक्ती गीत,गझल,नाट्यगीत,लावणी,अभंग,ज्ञानेश्वर माऊलींचे अभंग पासून ते कविवर्य मंगेश पाडगावकर,ग.दि.माडगूळकर,जगदीश खेबुडकर,शांताबाई शेळके अशा मराठीतल्या अत्यंत नामवंत कवीं, गीतकारांची गाणी तसेच साहिर लुधियानवी,शैलेंद्र, गुलजार अशा हिंदीमधील गीतकारांची गाणी सादर करण्यात आली.गिरीश पंचवाडकर यांनी या कार्यक्रमासाठी खास संगीतबद्ध केलेले “यमन से नमन आणि यमन तराणा” या शास्त्रीय रचनाही नादसप्तकच्या विद्यार्थ्यांनी उत्तम सादर केल्या.

याप्रसंगी बोलताना श्रीधर फडके म्हणाले की, भारतीय शास्त्रीय संगीतामधील यमन रागावर आयोजित केलेला हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे.यमन हा अत्यंत गंभीर प्रकृतीचा राग आहे,असे मानले जाते.परंतु या रागावर आधारित इतकी आनंदी गाणी गायली गेली आहेत. शास्त्रीय संगीतातील रागाचे स्वरूप त्याचा वापर सुगम संगीतात कसा केला आहे,याचा प्रत्यय बाबूजींच्या पराधीन आहे जगती या गाण्यातून येतो.या गाण्याबाबतच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले की,हे गाणे वेगळ्या चालीमध्ये झाले होते,पण दुसऱ्या दिवशी त्यांचे सहाय्यक संगीतकार प्रभाकर जोग यांच्यासोबत रिक्षामध्ये जाताना आताची यमन रागातील चाल सुचली. बाबूजींच्या संगीताव्यतिरिक्त मराठी व हिंदी मधील संगीतकारांनी यमन रागामध्ये अनेक गाणी दिली आहेत.

नादसप्तक संगीत विद्यालयाचे संस्थापक-संचालक आणि प्रख्यात गायक व संगीतकार गिरीश पंचवाडकर यांनी या कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन केले आहे.या संपूर्ण कार्यक्रमातील गाण्यांच्या संगीत संयोजन टीममध्ये प्रख्यात कलाकार सहभागी झाले होते. यामध्ये पुण्यातील ज्येष्ठ कीबोर्ड वादक व संगीत संयोजक विवेक परांजपे,युवा तबला वादक आणि नादसप्तक चे संचालक अक्षय पंचवाडकर, नागेश भोसेकर, गायिका मंजुश्री ओक आणि प्रसिध्द वादकांचा समावेश होता.

या यमनरंग कार्यक्रमांस पुणेकर रसिकांचा उदंड “हाऊसफुल ” प्रतिसाद लाभला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments