पुणे,26 डिसेंबर 2024 : आघाडीची हायड्रॉलिक प्रणाली आणि उपकरण उत्पादक कंपनी असलेल्या तुलसी हायड्रॉलिक्सने औद्योगिक हायड्रॉलिक्स क्षेत्रात आघाडीच्या जागतिक पुरवठादार असलेल्या दानफोस पॉवर सोल्युशन्स सोबत भारतातील पहिल्या टुलिंग प्रोग्रामसाठी हातळिवणी केली आहे.यासाठी पुण्यात दानफोस इंडिया इनोव्हेशन सेंटर (डीआयआयसी) येथे सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.याप्रसंगी तुलसी समुहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण जैन,तुलसी हायड्रॉलिक्सचे व्यवस्थापकीय भागीदार संजय कुमार श्रीवास्तव,तुलसी रबर प्रॉडक्टसचे संचालक पुरव जैन,दानफोस इंडिया इनोव्हेशन सेंटरचे वरिष्ठ संचालक अनिल घेगडे,दानफोस चे ग्लोबल प्रॉडक्ट मॅनेजमेंट लीडर नागेंद्र एचएल आणि दानफोस पॉवर सोल्युशन्स इंडियाचे विक्री प्रमुख राजेश अत्रेजा उपस्थित होते.
या सहकार्याचे मुख्य उद्दिष्ट भारतातील पश्चिम भागातील ओईएम ग्राहकांना जागतिक गुणवत्तेचे होज असेंब्लीज पुरविणे,अधिक सुरक्षा व कार्यक्षमता प्रदान करणे हे आहे.तुलसी हायड्रॉलिक्सची कुशलता आणि दानफोसचे तांत्रिक कौशल्य एकत्र करून हा उपक्रम बाजारपेठेतील वाढत्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी दोन्ही कंपन्यांना अधिक सक्षम करेल.
टुलिंग प्रोग्रामच्या वैशिष्टयांमध्ये दानफोस प्रमाणित असेंब्ली लाईन्स,क्वालिटी ॲश्युरन्साठी प्रक्रिया आणि ग्राहकांसाठी तांत्रिक व अभियांत्रिकी साहाय्य यांचा समावेश आहे.
दानफोस पॉवर सोल्युशन्सचे तीन वर्षांहून अधिक प्लॅटिनम कॅटेगरी डिस्ट्रीब्युटर म्हणून वारसा असलेल्या तुलसी हायड्रॉलिक्सने सातत्याने गुणवत्ता आणि अभिनवतेप्रती आपली कटिबध्दता दर्शविली आहे.पुण्यात स्थित असलेले तुलसी हायड्रॉलिक्स हे कचरा व्यवस्थापन,शेती,मटेरियल हँडलिंग आणि बांधकाम सामग्री उद्योगासाठी होज आणि ट्युब असेंब्लीजचे उत्पादन करते.
हा उपक्रम सहकार्याची ताकद प्रतिबिंबित करत अपेक्षेच्या पलीकडे जाऊन परिणाम प्रदान करण्यासाठी सामर्थ्याचा उपयोग करतो.प्रकल्प यशस्वी होण्यासाठी तांत्रिक कुशलता आणि प्रणालीच्या माध्यमातून या उपक्रमाला सहकार्य करणे हे डीआयसीसी टीमसाठी एक अभिमानाची बाब आहे.या भागीदारीमुळे तुलसी हायड्रॉलिक्सची बाजारपेठेतील पोहोच अधिक व्यापक होण्यास मदत होणार असून या भागातील ओईएम ग्राहकांना जागतिक दर्जाचे होज असेंब्ली सोल्युशन्स प्रदान करता येतील.अभिनवता,तांत्रिक साहाय्य आणि ग्राहककेंद्रित दृष्टीकोन ठेवत तुलसी हायड्रॉलिक्स आणि दानफोस पॉवर सोल्युशन्स शाश्वत विकास आणि उद्योग नेतृत्वाचा नवा मार्ग आखत आहेत.
—


