अखंड डिजिटल एकीकरण आणि वर्धित कार्यक्षमतेसह अनिवासी भारतीयांसाठी खाते उघडणे सुलभ करणार
· नवीन TAB-आधारित प्रक्रिया देशांतर्गत आणि निवडक आंतरराष्ट्रीय ठिकाणी रिअल-टाइम खाते सक्रिय करण्यासोबतच पेपरलेस सुविधा देते.
मुंबई, 02 जानेवारी, 2025: देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने अनिवासी भारतीयांसाठी (NRIs) NRE (नॉन रेसिडेंट एक्स्टर्नल) आणि NRO (नॉन रेसिडंट ऑर्डिनरी) खाती उघडण्याची प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी TAB-आधारित एंड-टू-एंड डिजिटल ऑन-बोर्डिंग प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन SBI चे अध्यक्ष श्री. चल्ला श्रीनिवासुलु सेट्टी यांनी केले आणि खाते उघडण्याची कार्यक्षमता तसेच सुविधा वाढविण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर करून भारतातील SBI शाखा आणि निवडक परदेशी कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.
कागदपत्रांची डिजिटल पडताळणी करून शाखांमध्ये आणि ग्राहकांच्या भेटीदरम्यान जलद खाते उघडण्याची प्रक्रिया राबवणे या उपक्रमामुळे सोपे होते. यामुळे ही प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि सोयीस्कर बनते.
या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी, SBI चे चेअरमन श्री. छल्ला श्रीनिवासुलु सेट्टी यांनी या उपक्रमाबाबत सांगितले की, “TAB-आधारित एंड-टू-एंड डिजिटल NRI खात्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वार्पर करणे, म्हणजे एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे एंड-टू-एंड डिजिटल सोल्यूशन टर्नअराउंड वेळेत मोठ्या प्रमाणात घट करेल आणि अखंड डिजिटल अनुभव देईल.”
हे समाधान एसबीआयची बँकिंग उत्कृष्टता तसेच नावीन्यपूर्णतेसाठी कायम वचनबद्धता अधोरेखित करते. तंत्रज्ञानाच्या सेवांमध्ये अखंडपणे समाकलित करून, बँक केवळ ग्राहकांच्या अपेक्षांना सक्षम आणि पूर्ण करत नाही, तर जागतिक बँकिंग कार्यक्षमता आणि सुलभतेसाठी नवीन मानके देखील सेट करते.


